Thursday, May 1, 2025
Homeमनोरंजनजितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, पोलिसांना पत्र लिहत केली 'ही' मागणी

जितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, पोलिसांना पत्र लिहत केली ‘ही’ मागणी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच अटक करण्यात आली.

- Advertisement -

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेनेही उडी घेतली आहे.

ठाण्यातील चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे. केतकीच्या वकिलांनी पोलिसांना तसं पत्रदेखील पाठवलं आहे.

“जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण प्रकरणी जे कलम लावण्यात आले आहेत ते लगेच जामीन मिळतील असे कलम लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं नाही. विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं”, असा आरोप केतकी चितळेने केला आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावावं, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.

“सामूहिकरित्या हा हल्ला झालाय. त्यामुळे एक कट रचला गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे विनयभंगाचं कलम पोलिसांनी का लावलं नाही?”, असं केतकीच्या वकिलांनी पोलिसांना पत्राद्वारे विचारलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी – ना. विखे...

0
लोणी |वार्ताहर| Loni पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल...