Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPrajakta Mali : प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये, पोलिसांना दिले...

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये, पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

मुंबई । Mumbai

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नामोल्लेख केला होता. परळीत इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा वेगळाच परळी पॅटर्न आहे.

- Advertisement -

याठिकाणी मोठ मोठ्या सेलिब्रिटी येत असल्याचे सांगून धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेतली होती. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. हा अर्ज राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला असून, महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांना काही निर्देश दिले आहेत.

बीडमधील देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याविरुद्ध प्राजक्ता माळीने राज्य महिला योगाकडे तक्रार दाखल केली. तसे तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने एक्सवर माहिती दिली आहे. त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. तिने सुरेश धस यांच्या वक्तव्याविषयी संताप व्यक्त केला होता. तसेच प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला आणि निवेदन देखील दिले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, महिलांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्राजक्ता माळी आणि तिच्या कुटुंबाला दिले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...