मुंबई | Mumbai
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. टोल वाढीवरुन मनसे (MNS) आक्रमक झाले असून अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही आवाज उठवला आहे. टोलदरवाढ केल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्या सोमवारी तेजस्विनीने देखील यावर भाष्य केले होते. टोल दरवाढीवरुन तेजस्विनी पंडीतने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला होता, आता तिच्या या ट्विटवरुन तिचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आले आहे.
तेजस्विनीने ट्विट केले आहे. तिने तिच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. ती यात म्हणते,”कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचे व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझे स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितले, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?”.
पुढे ती पोस्टमध्ये म्हणते ,”X (ट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणे, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!”.
म्हणून महायुती सरकारमध्ये सामील झालो…; महायुतीमधले शतक पुर्ण करताच अजित पवारांचे पत्र
तेजस्विनीने काय ट्विट केले होते
तेजस्विनीने व्हिडीओ शेअर करत लिहिले होते,”म्हणजे? यांना कळतंय ना नेमके हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून”.