Monday, November 25, 2024
Homeब्लॉगआनुवंशिकता संशोधनाचा कणा “ड्रोसोफिला”

आनुवंशिकता संशोधनाचा कणा “ड्रोसोफिला”

ड्रोसोफिला या वैज्ञानिक नावाचा अर्थ “दव प्रेमी” असा आहे, याचा अर्थ असा आहे की या प्रजातीला ओलसर वातावरण आवश्यक आहे. या किटकाचा पहिला आफ्रिकेबाहेरचा अधिवास विस्तार १०,००० ते १५,०००वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. ड्रोसोफिला मेलानोगास्टरचा हा छोटा किटक हा पिवळ्या तपकिरी रंगाचा असून तो बिनविषारी आहे आणि तो कोणत्याही अंगाने अपायकारक नाही. त्याचे डोळे लाल रंगाचे आणि खुप आकर्षक असतात. मादी नरापेक्षा थोडी मोठी असते. हे किटक प्रामुख्याने वनस्पतींच्या सामग्रीवर जगतात.

मादीकडून आपले अंडी पिकलेल्या फळांवर घातली जातात. त्यामुळे अळ्या विकसित होईपर्यंत फळ नुकतेच कुजण्यास सुरुवात झालेली असते आणि ते आळी अंडी घातलेल्या फळाचा त्यांच्या पोषणाचा सुरवातीचे अन्न म्हणून वापर करू शकतो. यांचे जीवनचक्र लहान असते. त्यांचे आयुष्य कमी असते, मोठ्या संख्येने संतती निर्माण करते, कमी खर्चात बंदिवासात सहजपणे पुनरुत्पादित केले जाऊ शकते, ते सहजपणे पुनरुत्पादित केले जाऊ शकतात व विपुल प्रमाणात वापरता येतात. आणि त्या मुळे संशोधकांना जलद प्रयोग करता येतात, म्हणून अनुवांशिक संशोधनासाठी एक प्रमुख कीटक म्हणून त्याला फार महत्व आहे. आनुवंशिकतेपासून ते अवयवांच्या विकासापर्यंतच्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी मॉडेल जीव म्हणून केला जातो. ड्रोसोफिला मेलानोगास्टरचा हा जगातील उष्ण कटिबंधात आढळतो. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता त्याची ओळख जगातील प्रत्येक खंडात झाली आहे. ड्रोसोफिला मेलानोगास्टर विविध अधिवासांमध्ये राहतो.ड्रोसोपिला मेलंगास्टरच्या निवासस्थानावर मर्यादा घालणारे मुख्य घटक म्हणजे तापमान आणि पाण्याची उपलब्धता हे आहेत.

- Advertisement -

‘असामान्य’ ताकत असलेला सामान्य कीटक : कोळी

ड्रोसोफिला मेलानोगास्टर एका शतकाहूनजास्त काळ हा कीटक संशोधनासाठी वापरला जात आहे. १९०० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रयोगशाळेत प्रथम वापरल्यापासून ते आजपर्यंत, ड्रोसोफिला मेलानोगास्टर हे आनुवंशिक शास्त्रातील महत्त्वाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी राहिले आहे. एक आदर्श जीव म्हणून ड्रोसोफिला मेलानोगास्टरचा वापर थॉमस हंट मॉर्गन यांच्या अग्रगण्य कार्यापासून सुरू झाला, ज्यांना १९३३ मध्ये शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ड्रोसोफिला मेलानोगास्टरचा उपयोग मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी केला जातो. मानवांसह सर्व प्राण्यांच्या जीवशास्त्राविषयीच्या अभ्यासासाठी आधार बनलेल्या ह्या किटकावर खुप संशोधन झाले आहे. आज, जगभरातील हजाराहून अधिक संशोधकांनी मानवी जीवशास्त्र आणि रोगाशी संबंधित विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोसोफिलासोबत काम करून अनेक महत्वाचे संशोधन केले आहे. हा कीटक तंत्रिकाशास्त्रज्ञांद्वारे शिकणे, स्मरणशक्ती, झोप, आक्रमकता, व्यसन आणि मज्जातंतूंच्या विकारांचा अभ्यास करण्यासाठी वापरला जात आहे.

मॉडेल म्हणून आता केवळ मानवी रोग-संबंधित जनुकांच्या अभ्यास करण्यासाठीच नव्हे तर उपचारात्मक संशोधनासाठी उमेदवार पदार्थांची तपासणी आणि मूल्यांकन करण्यासाठी देखील सक्रियपणे वापरली जात आहे. त्यामुळे असंख्य मानवी अनुवांशिक रोगांच्या अभ्य्सासाठी हा कीटक संशोधनाचा कणा आहे. ड्रोसोफिला मेलानोगास्टरचा उपयोग संशोधनात इतक्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हजारोंच्या संखेने हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध ‘ड्रॉसोफिला’ या शीर्षकात प्रकाशित झाले आहेत.४५ हून अधिक देशामधील ८०० प्रयोगशाळा मध्ये संशोधनाचे काम सुरु आहे. त्यात अनेक संशोधकांचा आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .

कीटकांच वेगळ विश्व…

– डॉ.लक्ष्मन घायवट

(प्राणिशास्त्र विभाग, एस.एम.बी.एस. टी.कॉलेज, संगमनेर)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या