घरमाशी ही जगातील माशीची सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे. हिचे मुळ मध्य आशियाचे असून ती आता जगभर पसरली आहे. हि माशी उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण हवामानातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात आढळू येते.
मस्का डोमेस्टीका म्हणजेच घरमाशी ही आपल्या घरात आणि अवतीभोवती नेहमी अढळनारी जगभरातील सर्वात सामान्य माशी आहे. ही एक न दंश करणारी माशी आहे. ही मानव आणि पाळीव प्राण्यांसोबत राहते आणि बहुतेकदा रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, फूड मार्केट, फिश मार्केट आणि कत्तलखाने यांच्या जवळपास जास्त प्रमाणात आढळते. ती 100 पेक्षा आजार मानव आणि प्राण्यांमध्ये पसवू शकते. ह्या आजारांमध्ये अर्भक अतिसार, अँथ्रॅक्स, कॉलरा, नेत्ररोग, बॅसिलरी डिसेंट्री, टायफॉइड आणि क्षयरोग यांचा समावेश होतो. ही परजीवी प्राण्यांचे अंडी, आणि, बॅक्टेरिया, बुरशी आणि विषाणू इत्यादी उलट्या किंवा मलमूत्राद्वारे प्रसारित करते. परजीवीचे अंडी, जीवाणू, बुरशी आणि विषाणूंसह रोगपसरवणाऱ्या घटकांना घाणीच्या ठिकाणाहून आपले घर, अन्न घर यांच्याकडे वाहून नेण्याचे काम करते. त्यांच्या केसाळ पायांवर असलेले केस हे जंतूची वाहतूक करतात. शरीराच्या पृष्ठभागावर असलेल्यारोग जंतू पेक्षा घरमाशी विष्ठा आणि उलट्या मधील रोगजनकांच्या संक्रमणाचा एक प्रमुख मार्ग म्हणून काम करतात. म्हणून मानवी किंवा प्राण्यांचे रोग थांबवण्यासाठी घरगुती माशांचे नियंत्रण आणि प्रतिबंध किंवा निर्मूलनासाठी विविध पद्धतींचा वापर करणे खुप महत्वाचे वाटू लागू आहे.त्यशिवाय काही आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही अस सल्ला जोखीम असलेल्या भागात आरोग्य शिक्षण विभागाकडून दिला जातो.
आनुवंशिकता संशोधनाचा कणा “ड्रोसोफिला”
घरमाशीच्या जीवन चक्रात अंडी, अळ्या, कोश अवस्था आहेत. ती एका वेळी ४-६ अंडी घालू शकते.अंड्यांची लांबी १-२ एमएम असते. अंड्याचा पांढरा रंग असतो आणि एका दिवसात अंडी उबवून अळ्या बनतात. अळ्या किंवा २-९ मिमी लांब आणि पांढर्या रंगाच्या असतात. त्यांना पाय नसतात आणि ते विष्ठा किंवा मृत किंवा कुजलेल्या सेंद्रिय पदार्थ अन्न म्हणून खातात व वाढतात . साधारण १४ ते ३६ तासांमध्ये त्यांचा तपकिरी रंगाचा कोश तयार होतो त्यातून ५ दिवसांत प्रौढ माशी बाहेर पडते. प्रौढ माशीचे आयुष्य १५ ते ३० दिवसांपर्यंत असते. प्रौढ माशी मध्ये पंखांची एक जोडी, चार गडद पट्ट्यांसह मिश्रित लालसर डोळे, चार लांबीचे काळे पट्टे असतात. प्रौढ माशीचे खास वैशिष्ट म्हणजे ती द्रव अन्न भिजवण्यासाठी तिचे तोंड स्पंज सारखे विकशीत झालेले आहे. त्यामुळे ती घन पदार्थ खाऊ शकते. हे अन्न द्रवपदार्थात बदलल्यानंतर थुंकून किंवा उलट्या करून त्यावर लाळ ग्रंथी स्रावाने विरघळतात आणि मग गिळले जाते. घरगुती माशी सरबत, दूध आणि मानवी वस्तीच्या भागात असलेले सर्व पदार्थ खातात.
औषधांना न जुमानणाऱ्या नवीन रोगजंतूचा उदय जलद गतीने होत आहे. यांचा वेग प्रतिजैविक औषधांच्या विकासापेक्षा जास्त आहे. ही एक जटिल आणि गंभीर समस्या आहे ज्यामुळे एखाद्या रोगाची महामारी होऊ शकते. त्यांचे माशीच्या मार्फत होणारे वितरण लक्षात घेऊन जगभरात सार्वजनिक आरोग्याची गंभीर चिंता बनली आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी असंख्य संशोधन अभ्यास करत आहेत. ही माशी मानवांच्या जवळ राहते. घरमाशी माणसांनचे आणि पाळीव प्राण्यांचे अनेक रोग वाहून नेऊ शकते म्हणून त्यांची लोकसंख्या कमी ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यांना नियंत्रित ठेवण्यासठी विविध वनस्पतींच्या तेले, निलगिरी तेल ,लेमनग्रास, लिंबूवर्गीय फळे यांचा उपयोग प्रभावी ठरतो. त्याच बरोबर खिडक्या स्क्रिनिंग आणि दरवाजे बंद ठेवणे, घर किंवा व्यवसायाभोवती लावलेले चिकट सापळे आणि अल्ट्राव्हायोलेट प्रकाश सापळे देखील घरातील माशांची संख्या कमी करू शकतात. इमारतीकडे अधिक कीटक आकर्षित होऊ नयेत यासाठी प्रकाश सापळे लावा येतात. सार्वजनिक किवा घरात अन्न दूषित होण्याचा धोका कमी करण्यासाठी अन्न तयार करण्याच्या ठिकाणापासून कमीत कमी ५ फूट अंतरावर सापळे ठेवावा लागतात. तरीही आवश्यक असल्यास, बाजारात उपलब्ध असलेली अनेक कीटकनाशके घरातील माशांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. पायरेथ्रॉइडसारखे कीटकनाशके घरांमध्ये आणि आजूबाजूच्या घरातील माशी मारण्यासाठी उपयोगी पडते. ही उत्पादने किराणा आणि व इतर स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात.
‘असामान्य’ ताकत असलेला सामान्य कीटक : कोळी
सद्या कुकुट पालन हा व्यवसाय खूप जोर धरत आहे कोंबड्यांखालील कोंबड्याच्या खतामध्ये माशी मोठ्या प्रमाणात तयार होते. तिचा प्रदुर्भाब सभोवतालच्या परिसरावर खूप होताना आढळतो. काही भागामध्ये आता ही एक गंभीर समस्या तयार झाली आहे, ज्यावर नियंत्रण आवश्यक आहे. स्वच्छता ही कोणत्याही माशी व्यवस्थापन कार्यक्रमातील मूलभूत पायरी आहे. माशी अंडी घालू शकतील असे अन्न व इतर कुजलेले, पदार्थ नष्ट केले पाहिजे. प्रौढ माशी मारल्याने प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. त्यामुळे उपाययोजनेचा भर त्यावर जास्त दिला पाहिजे. कचऱ्याच्या डब्याला झाकण लावलेले असावे. घरातील कचरा नेहमी झाकलेला असावा. जनावरांचे गोठे घरापासून दूर असावेत. शेन त्यांना अंडी घालण्यासाठीची एक चांगली जागा आहे, ती घरापासून दूर असावी. सध्या घरातील माशीद्वारे वाहून नेलेल्या रोगजंतू कोणतेही पद्धतशीर पुनरावलोकन नाही. त्यावर अभ्यास करणारे जवळपास दिड हजाराहून अधिक संशोधन पत्र प्रकाशित झाले आहेत .त्यावर अधिक संशोधन व जागरूकता होणे गरजेचे आहे.
कीटकांच वेगळ विश्व…
– डॉ.लक्ष्मन घायवट
(प्राणिशास्त्र विभाग, एस.एम.बी.एस. टी.कॉलेज, संगमनेर)