Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगविंचू विषारी पण अनेक आजारांवर गुणकारी

विंचू विषारी पण अनेक आजारांवर गुणकारी

विंचू हा प्राचीन काळातील प्राण्यांचा मोडणाऱ्या प्राण्यामधील एक कीटक आहे. त्यांचा प्रारंभिक उत्क्रांती इतिहासात त्याच्या अधिवासाबद्दल भिन्न मते प्रकाशित झाली आहेत. काही आभ्यासकांच्या मते विंचू समुद्रीप्राणी होते, तर काहींनी स्थलीय उत्पत्तीचा दावा केला आहे. काहीं अभ्यासकांच्या मते विंचू दुय्यम जलचर होते. आता हे वाळवंटाच्या अधिवासांव्यतिरिक्त, समशीतोष्ण, उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय वातावरणात गवताळ प्रदेश, जंगले यांच्याशी जुळवून घेतात. ते अंटार्क्टिका वगळता सर्व प्रमुख भूभागांवर राहतात. ते कॅनडा आणि मध्य युरोपपासून दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोका पसरलेले आहेत, ते न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्येही सापडतात.

युरोप आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील पर्वतांमध्ये समुद्रसपाटीपासून ५,००० मीटर उंचीवर विंचू आढळले आहेत. विंचू हे निशाचर असतात आणि दिवसा त्यांच्या, नैसर्गिक विवरांमध्ये किंवा खडक आणि झाडाखाली लपतात. अंधार पडल्यानंतर ते सक्रिय होतात आणि पहाटेच्या काही वेळापूर्वी ते फिरायचे थांबवतात. निसर्गात, विंचू अत्यंत फायदेशीर आहेत. विंचू हे भक्षक आहेत आणि म्हणून ते विविध प्रकारच्या कीटकांना खातात, त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित करणाऱ्या किटकामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. काही विंचू इतर विंचूंनाही खातात. त्यांचे प्रजनन उबदार महिन्यांत होते,उन्हाळ्यात मादी शोधण्यासाठी नर शेकडो मीटर प्रवास करू शकतात. विंचूमधील वीण हे पुरुषाने सुरू केलेल्या गुंतागुंतीच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. तो प्रथम मादीला पकडतो. मग नृत्यासारखी गतीमध्ये बाजूला होतात.

- Advertisement -

कीटकांच वेगळ विश्व…

जगात विंचूच्या अंदाजे १५००० प्रजाती आहेत आणि त्यापैकी फक्त 30 विषारी विष तयार करतात. भारतात जवळपास १२० प्रकारचे विंचू आढळतात, महाराष्ट्रात त्यतील दोन प्रामुख्याने आढळतात त्यातील एक, काळा विंचू आणि दुसरा लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो त्याल इंगळी असेही म्हटले जाते. लाल कोकणात जास्त प्रमाणात सापडतो हा जास्त घातक असून ह्याने नांगी मारल्यास माणूस दगावू शकतो. आपल्या परिसरात विंचू घराची कौले, जुने अडकूवून ठेवलेले कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळीच्या जागा, शेणाच्या गवऱ्या. दगडाच्या खाली, वाळलेल्या पालापाचोळ्यात अशा ठिकाणी अढळतो. रात्री छतातून विंचू खाली पडतात. आपला त्यांना धक्का लागला तर स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दंश करतात. विंचवाचे विष न्यूरोटॉक्सिनमुळे सामान्यत: तीव्र वेदना, डंकभोवती मुंग्या येणे आणि बधीरपणा, डंकभोवती सूज येणे, श्वास घेण्यात अडचण येणे, मळमळ, उलट्या, उच्च रक्तदाब, हृदय गती अनियमित होणे, अस्वस्थ वाटणे, घाम येणे, मळमळ, उलट्या होणे, अतिसंवेदनशीलता आणि काही प्रकरणांमध्ये, बेशुद्धी आणि हृदय थाबुन, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

‘असामान्य’ ताकत असलेला सामान्य कीटक : कोळी

औषधी हेतूंसाठी विंचूचा वापर हजारो वर्षांपासून चीन आणि ग्रीसमध्ये केला जातो. जिथे ते विविध आजारांवर उपचार करण्यासाठी हे विष वापरले जात होते. आधुनिक काळातील संशोधनाने दर्शविले आहे की, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि पार्किन्सन रोगावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. विंचवाचे विष अनेक औषधामध्ये वापेले जाते. कॅन्सरविरोधी एजंट म्हणून या विषाच्या घटकांची उपयोगीत्ता संशोधकांना सापडली आहे. मेक्सिको आणि क्युबामधील संशोधकांनी शोधून काढले आहे की काही विंचू प्रजातींच्या विषातील संयुगे प्रयोगशाळेतील चाचणीत कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करतात आणि नष्ट करतात परंतु रक्ताच्या कर्करोगांवर ते कार्य करत नाही. ह्या विषाच्या वापरानंतर बर्‍याच रुग्णांमध्ये ट्यूमरच्या आकारात घट दिसून आली आणि कमी साइड इफेक्ट्स आणि जास्त उपयोगीत्ता देखील दिसून आली. संशोधनात विष वापरणाऱ्या जवळपास 100 टक्के लोकांच्या वेदना कमी झाल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या संशोधनात असे यश आले आहे की, विंचूच्या विषामध्ये नवीन प्रकारच्या वेदना व्यवस्थापन औषधांची गुरुकिल्ली असू शकते.

पावसाळ्यातील प्रमुख समस्या ‘घरमाशी’ (Musca domestica)

– डॉ.लक्ष्मन घायवट

(प्राणिशास्त्र विभाग, एस.एम.बी.एस. टी.कॉलेज, संगमनेर)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या