Sunday, May 26, 2024
Homeब्लॉग'असामान्य' ताकत असलेला सामान्य कीटक : कोळी

‘असामान्य’ ताकत असलेला सामान्य कीटक : कोळी

आपण बोलताना किड्या माकोड्या सारखी जिंदगी असं म्हणतो, पण आपण कीटकांना आपण कमी लेखून चालणार नाही. कारण वातावरणात अनेक बदल होत असताना कीटक मात्र त्यांच्या प्रजाती टिकून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. ते केवळ त्यांच्यातल्या असामान्य ताकती मुळेच. कीटकांच्या अनेक प्रजाती पैकी स्पायडर म्हणजेच कोळी ही एक जात साधारणत जात. घराच्या भिंतीवर, बागेमध्ये, झाडांवर आणि जवळजवळ सर्वच अधिवासांमध्ये सापडनारा हा कीटक उंच डोंगरापासून तू खोल देण्यापर्यंत सापडतो. जाळे विणून त्यात आपले भक्ष पकडणारा किडा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

जगात कोळ्याच्या सु. ६०,००० च्या वर जाती आहे. कोळी इतर कीटकांपासून वेगळा ओळखला जातो. कारण सर्व कोळ्यांना आठ पाय आणि सहा ते आठ डोळे असतात. कोळी हा आपल्या अन्न पकडतो त्याच्या शरीरामध्ये आपल्या शरीरातील विषारी द्रव्य सोडतो मग त्याच्या शरीरातील जीव रस शोषून हा त्यावरती जगतो. अत्यंत नाजूक अशा या कोळ्याच्या जाळ्याच्या रेश्मा सारख्या दिसणाऱ्या धाग्यांकडे पाहिले तरीही धागे सहजा सहजी तुटतील असे आपल्याला वाटते परंतु या कोळ्याने विणलेल्या जाळ्याच्या धाग्यांमध्ये इतकी मोठी ताकद असते की त्यात छोटे पक्षी, छोटे सरडे, सुद्धा अडकले जातात आणि त्यांची शिकार करून कोळी ते अन्न म्हणून वापरतो. हे अन्न कोळी त्याच्या शरीरात साठवून ठेवतो. त्या साठवलेल्या अन्नावर तो तीस महिने जगू शकतो.

- Advertisement -

कोळी हा कीटक तसा उपद्रवीही आहे. वेगवेगळ्या पिकांवर त्याचा प्रादुर्भाव झाल्यास तो पिकांचे नासाडी करतो हे जरी खरी असले तरी कोळ्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी होऊ शकतो. घरामध्ये दिसणाऱ्या कोळ्यांच्या जाळ्यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक अडकलेले दिसतील, त्यात डास, झुरळ यांचा समावेश असतो. हे आपल्या घरात आजार पसरवण्याचे काम करत असता. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कोळी करत असतो. शेताच्या कडेला बांधाला झाडांवर कोळ्यांनी जी जाळी विणलेली असतात या जाळ्यामध्ये तुम्हाला अनेक कीटक अटकलेले दिसतील की जे कीटक आपल्या पिकाची नासाडी करत असतात. त्यामुळे पिकांचे रक्षण होऊन उत्पन्न वाढीस मदत होते. संशोधकांनी वेगवेगळ्या कसोटीवर तपासून कोळ्याचे जाळे विणण्याचा धागा स्टील पेक्षा मजबूत आणि कृत्रिम फायबर पेक्षा कठीण असतो हे सिद्ध केले आहे. कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीमुळे कोळ्याचे जाळे अनेक प्रकारचे बदल झाले आहेत. कोळ्याचे जाळे, त्याची रचना आणि विन हा अनेक संशोधकांच्या संशोधनाचा विषय बनला आहे. सगळेच कोळी जाळी विणीत नाहीत. अगदी थोडे कोळी अशी जाळी विणतातकाही कोळी. काही कोळी भक्ष्याचा पाठलाग करून त्याला पकडतो, अश्या कोळ्यांचे डोळे फार तीक्ष्ण असतात.

कीटकांच वेगळ विश्व…

जगभराच्या पाठीवर सापडणाऱ्या कोळ्यांमध्ये काही कोळी हे अत्यंत विषारी आणि मानवास घातक आहेत. हे कोळी भारतात सापडत नाहीत. त्यांच्या विषाने माणसाचा तात्काळ मृत्यू होतो, कोळ्यांमध्ये सापडणारे विष हे न्यूटॉक्सिन म्हणजेच आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करणारे आहे. विषय नागाचे विष आपल्या चेतन संस्थांवर परिणाम केल्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास अडथळ निर्माण होऊन आपला मृत्यू होतो त्याचप्रमाणे या विषाचा आपल्या शरीरात गेल्यानंतर अगदी थोड्या वेळातच परिणाम दिसू लागतो. ते चेतासंस्थेमध्ये बाधा निर्माण करतात, आपल्या अवयवांची हालचाल मंदावते श्वास मंदावतो आणि माणसाचा मृत्यू होतो. असे असले तरी कोळी हा पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका पार पडणारा कीटक आहे. दरवर्षी हे कोळी जगभरात अन्न म्हणून ८० टनाहून अधिक वजनाचे कीटक खून फस्त करतात व आपल्या पिकांच स्वरक्षण करतात व पर्यावरणाचा समतोल राखतात. काही देशामध्ये लोक कोळी हौस म्हणून पाळतात. असे असेले तरी संशोधकांच्या नजरेतून कोळी अत्यंत उपयोगी कीटक आहे. भविष्यात कोळ्याच्या विषाचा उपयोग स्ट्रोक, कर्करोग, वेदना यासारख्या रोगांच्या उपचारांवर करण्यासठी होऊ शकतो या वर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. असा सामान्य दिसणारा कोळी असामान्य आहे.

– प्रा.डॉ.लक्ष्मण घायवट

(लेखक बी.एस.टी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या