मानव ही निसर्गाच्या सृष्टीतील सर्वात श्रेष्ठ प्रजाती आहे आणि त्यांच्यासाठी सर्व प्रजातींशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे. पण लोकसंख्येच्या स्फोटामुळे त्याचे अन्न आणि आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. अन्न आणि आरोग्याशी संबंधित संकटावर मात करण्यासाठी नैसर्गिक जैव संसाधनाचा वापर हा पूर्वी पासून केला गेला आहे आणि हि काळाची गरज होणार आहे. कीटक हे निसर्गातील वैविध्यपूर्ण गट आहेत. त्याचा उपयोग पौष्टिक अन्न आणि औषधी म्हणून मानवाने फार प्राचीन काळा पासून केला आहे पोषक अन्न आणि विविध आजारांवर वाळवी हे पारंपारिक औषध म्हणून वापरले गेल्याचे पुरावे आहेत .
वाळवीच्या सुमारे २६५० प्रजाती आहेत. अंदाजे ५००-१००० प्रजातींचे वर्गीकरण करणे बाकी आहे. उष्ण कटिबंधांत त्यांच्या जाती व संख्या सर्वात जास्त आहेत. उष्ण कटिबंधातील ती विपुल प्रमाणात आढळते. वाळवीची सर्वाधिक विविधता आफ्रिका, दक्षिण अमेरिका या भागात भरपूर प्रमाणात आढळते. वाळवी दीर्घकाळ कोरडा काळ सहन करू शकतात. वाळलेल्या नी जुन्या लाकडामध्ये वाळवीच्या छोट्या वसाहती असतात. जंगलामधील जुने वाळलेली आणि कुजलेल्या लाकडामध्ये खूप काळ जीवंत राहते आणि सहजासहजी त्या सोबत वाहून नेली जाते व ती आपल्या शेतात घरात येऊन पोहचते.
वाळवी पर्यावरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जसे सेंद्रिय पदार्थांचे विघटन पोषक तत्वांमध्ये करणे. मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलणे, संतुलन राखणे इत्यादी. आपल्याकडे उधई या नावानेही ओळखली जाते. वाळवीचे शरीर तीन भागामध्ये विभागलेले असते. ते खूप मऊ आणि फिकट पिवळ्या रंगाचे असते. वाळवी संघटित आणि एकत्र वसाहतीत रहाते. त्यांच्या तीन जाती आहेत त्यांच्या जातीजातींमध्ये शरीर संरचना, कार्य आणि वर्तन यांच्या नुसार कामांची विभागणी केलेली झालेली असते. मादी, रक्षक आणि कामकरी त्यांच्या प्रमुख जाती आहेत.
वाळवीचे मुख्य अन्न लाकूड, गवत, पाने, शेणखत व कागद, कार्डबोर्ड, कापूस इत्यादी आहे. वाळवी लाकडी इमारतीतील लाकडाचे खूपच नुकसान करते. मातीशी संपर्क असलेले कुंपणाचे, लाकडी खांब, लाकडी पूल यांचे ही फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते होते. त्याचप्रमाणे शेतातील उभी आणि कापलेली पिके, फळझाडे, नारळ, ऊस, कापूस यांचे अतोनात नुकसान होते. त्याच बरोबर घरातील फर्निचर, कपडे, पुस्तके, गालिचे, टोपल्या व घरगुती इतर सामानांचेही फार नुकसान होते. वाळवीचा उपद्रव फारच असेल तर तिचा प्रतिबंध करणे गरजेचे असते. यूएस मध्ये दरवर्षी वाळवीमुळे सरासरी ५ अब्ज डॉलर्सचे नुकसान होते आणि जर वाळवीच्या समस्या असेल तर नुकसान दुरुस्त करण्यासाठी सरासरी ३००० डॉलर्स खर्च करावे लागतात.
यूएस मध्ये जास्त नाहीत नाही, परंतु इतर देशांमध्ये वाळवीच्या काही प्रजाती प्रत्यक्षात लोकांसाठी अन्न स्रोत वापरल्या जात आहेत. वाळवीमध्ये सापडणारे खनिज, जीवनसत्व आणि पौष्टिक तत्वाचे परीक्षण केला असता त्यांच्या रचनेवरून असे दिसून आले की राणी आणि कामगारांच्या तुलनेत सैनिकांमध्ये क्रूड प्रोटीनचे प्रमाण जास्त होते. राणीमध्ये आढळणारे सर्वात जास्त सोडियम आहे. व्हिटॅमिन ए आणि सी फॅट भरपूर असतात. जे आपल्या शरीराला पोषक असतात. म्हणून त्यांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो. दक्षिण आफ्रिकेत राहणारे अनेक गरीब लोकांसाठी वाळवी उत्पन्नाचे साधन आहे. तळलेल्या वाळवी ३०० रुपये प्रती २० ग्रॅम प्रमाणे विकल्या जातात. ग्रामीण दक्षिण आफ्रिकन स्त्रिया पारंपारिकपणे वाळवी ताज्या ऐवजी तळलेले खातात.
वाळवीच्या काही जाती मानवाला उपयुक्त असल्याचीही नोंद काहिठिकानी आहे. त्यांचा अन्न म्हणून व औषधामध्ये उपयोग होतो. जमिनीत हवा खेळती ठेवणे व तिची सुपीकता वाढणे या कामीही उपयुकत आहेत. आदिवासी लोक जमिनित खोलवर सापडणारी वाळवी किंवा राणी जिवंत तळून किंवा परतून खातात. वाळवीच्या घरट्याचाही औषधी उपयोग होतो. घरटे जाळून त्याचा धूर छातीच्या विकारांवर हुंगतात. ओरिसामध्ये काही आदिवासी वाळवीची जिवंत राणी खातात, कारण ती तीव्र कामोत्तेजक समजतात. मध्य आशियातील वाळवंटांतील वाळवीच्या घरट्याची माती नायट्रेट खत म्हणून वापरतात. वारुळाच्या मातीचा उपयोग टेनिसचे क्रीडांगण बनविण्यासाठी व झोपड्यांतील जमीन बनविण्यासाठी आफ्रिकेत व ऑस्ट्रेलियात केला जातो. श्रीलंकेत तिचा उपयोग रत्नांना पॉलिश करण्यासाठी करतात व काही जमाती सैंधवाऐवजी ही माती खातात.आपल्या भागांमध्ये, चूल बनवणे,पोळ्याच्या सणाला बैल व इतर मूर्ती बनवण्यासाठी त्या मातीचा खास उपयोग केला जातो.
वाळवीच्या लागणीमुळे इमारतीच्या लाकडाला भोके पडतात .ते आटोक्यात आणण्यासाठी त्यांत सोडियम फ्लुओरोसिलिकेट, सोडियम फ्ल्युओराइड, कॅल्शियम आर्सेनट. भरून भोके बंद करतात. जास्त भागाला वाळवी लागल्यास मिथिल ब्रोमाइडाची धुरी देतात. इमारतीच्या पायाभोवती वरील कीटकनाशके जमिनीत ओततात किंवा भोके पाडून त्यांत भरतात. आणखी एक सोपा उपाय म्हणजे वाळवीच्या वसाहतीला ओलावा मिळू न देणे. त्यामुळे वाळवी लोकवस्तीच्या आसपास वारुळे तयार करीत नाही. वेळोवेळी वाळवीची काळजी न घेतल्यास घराचे, धान्याचे, कपडे, पुस्तके, याचे मोठे नुकसान होऊ शकते.,
– डॉ.लक्ष्मन घायवट
(प्राणिशास्त्र विभाग, एस.एम.बी.एस. टी.कॉलेज, संगमनेर)