Monday, April 21, 2025
HomeमनोरंजनRajeshwari Kharat: फँड्रीतील 'शालु' राजेश्वरी खरातने स्विकारला ख्रिश्चन धर्म, फोटो शेअर करत...

Rajeshwari Kharat: फँड्रीतील ‘शालु’ राजेश्वरी खरातने स्विकारला ख्रिश्चन धर्म, फोटो शेअर करत दिली माहिती; नेटकरी म्हणाले…

मुंबई | Mumbai
‘फँन्ड्री’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने आपल्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला आहे. राजेश्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पाण्यामध्ये ती हात जोडून उभी असलेली दिसतेय. सोबत राजेश्वरी खरातने ‘Baptised’ असे फोटोला कॅप्शन लिहून तिने हार्ट इमोजी शेअर केलाय. ‘Baptised’ याचा अर्थ बाप्तिस्मा असा होत आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी नदीच्या पाण्यात हात जोडून उभी असून, तिच्या डोक्यावर आशिर्वाद देतानाचा हात आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

याशिवाय तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहे. हॅशटॅगमध्ये तिने नवीन सुरूवात. बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले आहे. या फोटोतून स्पष्ट होते की, तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. मात्र तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

- Advertisement -

https://www.instagram.com/p/DIshOQrtt7T/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

राजेश्वरी खरात फोटोमध्ये अतिशय शांत दिसत आहे. भक्तिभावाने भरलेला तिचा लूक लक्षवेधी असून पाण्यात हात जोडून ती उभी असलेली दिसते. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. काहींनी “गॉड ब्लेस यू” अशी कमेंट केली आहे, तर काहींनी “नवा अध्याय शुभ असो” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/DIrAd9zyJ40/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

तर काही नेटकऱ्यांनी तिच्या या निर्णयावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले की, ख्रिश्चिन धर्मापेक्षा ही प्राचीन आणि सुंदर असा बुद्धाचा धम्म असताना दूसऱ्या धर्माची गरज लागतेच कशाला..? बाबासाहेबांनी तब्बल २५ वर्ष अभ्यास करून हा भारतीय मूळ असलेला धम्म दिला तो असेच नव्हे..! तुमच्यापेक्षा गरीब लोक बरे जे स्वाभिमानी असतात. दुसऱ्या एकाने लिहिले की, काळी चिमणी घालवली लगा….. बऱ्याच लोकांनी अनफॉलो अशी कमेंट केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या