Saturday, May 4, 2024
Homeनगरमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा - ना. थोरात

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा – ना. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) –

अनेक हजारो वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे. वैभवशाली संत परंपरे पासून सध्याचे साहित्यिक कवी यांनी या भाषेच्या

- Advertisement -

वैभवात मध्ये मोठी भर घातली आहे. अशा या महाराष्ट्राची संपन्नता असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे असे मत रायाचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

संगमनेर येथे मराठी भाषा निमित्त बोलताना नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, हजारो वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत चोखामेळा यासंह विविध संतांनी समृद्ध केली आहे. या भाषेत संत, साहित्यिक, कवी, लेखक यांनी मोठी समृद्धता आणली आहे.

वि. वा. शिरवाडकर, ग. दि. माडगूळकर, प्र. के. अत्रे, बहिणाबाई चौधरी यांच्यासह अनेक मोठमोठे साहित्यिक महाराष्ट्राला लाभले. खरेतर मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळालाच पाहिजे. यामध्ये काही उणिवा राहिल्या असतील तर तज्ञांनी जास्तीत जास्त काम करून लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.

याचबरोबर बाहेरील भाषांचे कितीही आक्रमणे झाली तरी मराठी भाषेमधील समृद्धता संपणार नाही. इंग्रज आले इंग्रजी घेऊन आले हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे तरीही मराठी भाषा आपले अस्तित्व टिकून आहे आणि ते आणखी समृद्ध होणार आहे शालेय शिक्षणामध्ये मराठी विषय अनिवार्य केला असून मराठीचा संपन्नता वाढविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

महाविकास आघाडी सरकार मराठीच्या विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवत आहे. याच बरोबर आगामी काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी आणखी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या