Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"भाषेबद्दल बोलताना भान बाळगायला हवे, ते राखले गेले नाही तर समोरचा गाल…";...

“भाषेबद्दल बोलताना भान बाळगायला हवे, ते राखले गेले नाही तर समोरचा गाल…”; सुशील केडियांच्या ट्विटवर मनसेचा पलटवार

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे विधान केले आहे. मी मराठी शिकणार नाही, अशी घोषणाच केडिया यांनी सोशल मीडियावरुन केली आहे. त्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

केडियांची पोस्ट काय?
सुशील केडिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट समजत नाही. जोपर्यंत तुमच्यासारख्यांना मराठी माणसांची देखभाल करण्याचा दिखावा करण्याची परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तशी प्रतिज्ञा मी घेतोय. काय करायचंय ते बोल?’, अशी पोस्ट केडिया यांनी केली. त्यांनी या पोस्टमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंना टॅगदेखील केले आहे.

- Advertisement -

केडिया यांच्या पोस्टनंतर त्याचे राजकीय पडसाद उमटले. मला राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे मला संरक्षण द्या, असे आवाहन त्यांनी केले. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांचे आयुक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या मंत्रालयाला यांना टॅग केले आहे.

YouTube video player

…तर समोरचा गाल लाल करेल
दरम्यान, मराठी भाषा शिकणार नाही, अशी प्रतिज्ञा घेणाऱ्या केडिया यांना मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. केडिया यांच्या पोस्टमध्ये मुजोरी दिसते. अशी भाषा केली जाणार असेल तर मग प्रत्युत्तर मिळणारच. मराठी भाषेचा आदर इथे राहणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा. त्या भाषेबद्दल बोलताना भान बाळगायला हवे. ते राखले गेले नाही तर समोरचा गाल लाल करेल. मग तेव्हा रडत बसायचे नाही, अशा शब्दांत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केडिया यांना इशारा दिला.

आधी जाहीर म्हणायचे आणि धमक्या येताच सुरक्षेची मागणी
आधी मराठी भाषेविरोधात ट्विट करायचे. भाषा बोलणार नाही असे जाहीर म्हणायचे. त्यानंतर धमक्या येताच सुरक्षेची मागणी करायची. यामागे यांचे सुप्त हेतू काय आहेत? असा सवाल किल्लेदारांनी विचारला. ‘३० वर्षे मुंबईत राहतो. पण मराठी कळत नाही. मराठी शिकणार नाही मुजोरी आहे. मिरारोडमधील व्यावसायिकाची कुंडली आम्ही काढली आहे. आता केडियाचीही कुंडली काढावी लागेल,’ असे म्हणत किल्लेदारांनी केडियांना लक्ष्य केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...