मुंबई | Mumbai
‘मी पुन्हा जन्माला आलो तर पहिलवानच होईन अन् असलंच अजून एखादं पदक माझ्या भारताला मिळवून देईन,’ असं म्हणणारा लाल मातीतला पैलवान म्हणजे ऑलिंपिक पदकवीर खाशाबा जाधव, देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस. कुस्तीच्या क्षेत्रात भारताचं नाव सर्वप्रथम जगात झळकवणारा महाराष्ट्रपुत्र.
या महाराष्ट्रपुत्राची संघर्षकहानी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज यांनी ही घोषणा केली आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांना सजग करणारे चित्रपट तयार करण्यात नागराजची ओळख आहे.
Dadasaheb Phalke Award 2023 : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
आमिर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून गीता आणि बबिता फोगाट यांच्या कुस्तीचा सुवर्णप्रवास दाखवण्यात आला होता. आता गावच्या लाल मातीत खेळलेला आणि देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस म्हणजेच, खाशाबा जाधव यांचं आयुष्य रुपेरी पडद्याच्या माध्यमातून जगासमोर यावं यासाठी नागराज मंजुळे हा सिनेमा बनवणार आहेत.
नागराज मंजुळे म्हणाले, “खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी यासंदर्भात माहिती देईल. या सिनेमाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे”.
संतापजनक! ६५ वर्षाच्या वृद्धाचा दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
खाशाबा जाधव यांच्याबद्दल जाणून घ्या…
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या खाशाबा जाधव यांनी भारताला पहिलं ऑलिंपिंक मेडल मिळवून दिलं. खाशाबांच्या या पराक्रमानं त्यांचं नाव अवघ्या देशाला माहित झालं. पण खाशाबांच्या या विजयामागे त्यांची मेहनत आणि जिद्द होती.
पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्याच्या एका खेडेगावात झाला. खाशाबा हे ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे सर्वात लहान चिरंजीव. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई. घरची शेती, वडील शेतकरी होते आणि सोबत कुस्तीही खेळायचे. या जाधवांच्या घरात शेतीची कामं झाली की, संध्याकाळी कुस्तीचे डाव खेळले जायचे.
तुम्हाला माहिती आहे का? ‘स्वर्गदारा’तील तार्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..
दादासाहेब जाधवांनी खाशाबाचे कुस्तीतील प्राथमिक शिक्षण आपल्या घरीच पूर्ण केले. पुढे खाशाबांना महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. खाशाबांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही भाग घेतला. त्याचवेळी आपल्या देशाचा तिरंगा ऑलिंमिक स्पर्धेमध्ये फडकवण्याचा निश्चिय केला.
असे म्हटले जाते की, त्यांचा कुशल दृष्टीकोन आणि उत्कृष्ट डावपेच यामुळे ते त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणले जाऊ लागले. जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या (जे एक कुस्तीपटू देखील होते) आणि इतर व्यावसायिक कुस्तीपटूंच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आणि अनेक राज्य आणि राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
भररस्त्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
खाशाबा जाधवांनी १९४८ मध्ये लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी खशाबांना अनेकांनी आर्थिक मदत केली होती. पुढे १९५२ मध्ये हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्री स्टाइल प्रकारात कास्यंपदक जिंकून खाशाबा जाधव तमाम भारतीयांच्या गळ्यातील स्टार झाले.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे खाशाबा जाधव यांना हेलसिंकी ऑलिम्पिकमधील जबरदस्त कामगिरीनंतर आपली कुस्ती कारकीर्द पुढे सुरू ठेवता आली नाही. नंतर त्यांनी पोलीस दलात अधिकारी म्हणून काम केले. १९८४ मध्ये त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार प्रदान केला. २०१० मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी कुस्तीचे ठिकाणही त्यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले होते.
VIDEO : भर कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की; अंगरक्षक जखमी