मराठमोळी ‘शाह’ आता बिगबॉस मराठी ३ मध्ये !
अनेक दिवस प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरणाऱ्या बिगबॉस मराठी सीजन ३ च्या स्पर्धकांवरून आता पडदा उठला आहे. मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावर नशीब आजमावणाऱ्या अनेक बिलंदर कलाकारांचा या सिजनमध्ये समावेश आहे. ज्यात मुंबईची मराठमोळी मुलगी मीनल शहा हिचा देखील समावेश आहे!
‘शाह’ आणि मराठमोळी कशी? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मीनलचे शालेय शिक्षण हे वांद्रे पूर्व येथील आयईएस न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मराठी माध्यमात झाले.
तिची आई मराठी असल्यामुळे, लहानपणापासूनच तिच्यावर मराठी संस्कृती आणि भाषेचं प्रभुत्व आहे.
मी लहान असताना माझे आई वडील वेगळे झाले होते, त्यापासून मी आणि माझा भाऊ आईसोबत राहत आहे.
वडील गुजराती जरी असले तरी आई मराठी असल्यामुळे तिने आमच्यावर लहानपणापासून महाराष्ट्रीयन संस्कार केले.
मुंबईतील एका सामान्य मराठी कुटुंबीयांमध्ये तीचा जन्म झाल्याचे ती अभिमानाने सांगते.
विश्वास बसणार नाही पण मीनल ही एमटीव्ही रोडीज स्टारदेखील आहे.
तिने अनेक कठीण स्टंट करून सेमीफायनल मध्ये जागा मिळवली होती
बिगबॉस मराठी सीजन ३ च्या घरात मीनल काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे !
धमाका होणार; तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात, हे आहेत १५ जण