दिल्ली | Delhi
संपूर्ण देशातील क्रिडा प्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे.
नेमबाजी प्रकारात पहिले पदक जिंकत या स्पर्धेत भारताने विजयी वाटचाल सुरू केली. पुरुष दुहेरी लाइटवेट प्रकारातही पदके जिंकली. ही दोन्ही पदके रौप्य आहेत. महिलाच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताने रौप्यपदक जिंकले. रोईंगमध्ये दुसरे पदक जिंकले. भारताच्या रमिला, मेहुली आणि आशी या महिला खेळाडूंनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले. या तिन्ही खेळाडूंनी मिळून 1886 गुण मिळवले. ज्यामध्ये रमिताला 631.9, मेहुली 630.8 तर आशी हिला 623.3 गुण मिळाले.
नेमबाजी प्रकारात भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्स प्रकारात अर्जुन सिंह आणि जाट सिंह यांनी 6:28:18 या वेळेसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताच्या तुलनेत चीनच्या खेळाडूंनी सरस कामगिरी केली. नेमबाजी प्रकारात चीनच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कामाई केली.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने जबरदस्त खेळ करत रौप्यपदक निश्चित केले. उपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशने फक्त 51 धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना दोन विकेट गमावत भारताने विजय साकार केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच सहभाग घेतला आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. रौप्यपदकांची कमाई करत चांगले यश मिळवले आहे. यानंतर आता 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात विजयी होणाऱ्या संघाविरुद्ध टीम इंडियाचा सामना होईल.
भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत
10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
पुरुष कॉक्सड 8 संघ (रोइंग): रौप्य
महिला 10 मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य