Friday, April 25, 2025
Homeनगरमराठी नाट्य संमेलनाचा आज उद्घाटन सोहळा

मराठी नाट्य संमेलनाचा आज उद्घाटन सोहळा

सावेडी उपनगरात दुपारी 4 वाजता निघणार दिंडी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज (दि.26) पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात शाहू मोडक नगरीत सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे विश्वस्त व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे विश्वस्त व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.

- Advertisement -

नांदी म्हणजे ईश्वराचे स्तवन, मंगलाचरण असणारी एक प्रकारची लोककला आहे. नाटकाचा प्रयोग सुखरूप पार पडावा म्हणून नाट्यारंभी नांदी म्हटली जाते. संमेलनासाठी नगरच्या मंगल पाठक लिखित आणि ऋतुजा पाठक यांनी संगीतबद्ध केलेली विशेष नांदी आज उद्घाटनप्रसंगी निनादणार आहे. दुपारी 4 वाजता भव्य नाट्य दिंडीही काढण्यात येणार आहे. प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, माऊली सभागृह असा प्रवास करत संमेलनस्थळी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात दिंडी दाखल होईल.

संमेलनप्रमुख क्षितिज झावरे यांची संकल्पना असलेले सुप्रिया ओगले दिग्दर्शित स्वागतासाठी 100 नृत्यांगनांचा नृत्याविष्कार यावेळी पहायला मिळेल. उदघाटनानंतर सायंकाळी 7 वाजता अभिनेत्री मानसी नाईक, माधवी निमकर, विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, गायिका सन्मिता धापटे-शिंदे, गायक राहुल सक्सेना व चंद्रशेखर महामुनी, अभिनेते कमलाकर सातपुते, झी सारेगम फेम संदीप उबाळे, मयूर पालंडे, कविता जावळेकर हे कलाकार संगीत रजनी सादर करणार आहेत.

या ऐतिहासिक नाट्य संमेलनात रसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, निमंत्रक आमदार संग्राम जगताप, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, उपनगर शाखेचे अध्यक्ष-प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे, मध्यवर्ती कोषाध्यक्ष सतीश लोटके, मध्यवर्ती नियामक मंडळ सदस्य संजय दळवी, अहिल्यानगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, कोषाध्यक्ष जालिंदर शिंदे, मार्गदर्शक पी. डी. कुलकर्णी, प्रसिद्धीप्रमुख अविनाश कराळे आदींनी केले आहे.

‘गणपति रे…अधिपति रे…’
उद्या (दि.27) नगरचे 100 कलाकार ‘गणपति रे…अधिपति रे…’ हे विशेष स्वागतगीत सादर करणार आहेत. या स्वागतगीताची रचना संजोग धोत्रे यांनी केली असून पवन श्रीकांत नाईक यांनी ते संगीतबद्ध केले आहे. अभिजीत अपस्तंभ, आदेश चव्हाण, अनिरुद्ध धर्माधिकारी, भार्गव देशपांडे, मूलांशु परदेशी, पवन श्रीकांत नाईक, अनुजा कुलकर्णी, ऋतुजा पाठक, अमृता बेडेकर, वर्षा पंडीत, संपदा चौधरी, अपर्णा बालटे व श्रेया सुवर्णपाठकी हे गायक- ायिका या स्वागतगीताचे गायन करणार आहेत. पवन श्रीकांत नाईक, ऋतुजा पाठक व अमृता बेडेकर हे संवादिनी वाद्याची संगत करणार असून प्रणव देशपांडे व कुलदीप चव्हाण हे सिंथेसायझर व बेंजो वाद्याची संगत करणार आहेत. तबला वाद्य संगत शेखर दरवडे व प्रसाद सुवर्णपाठकी यांचे असून सहवाद्य संगत श्रेयस शित्रे व राधिका परदेशी यांचे असणार आहे. ज्ञानदेव आढाव, नवरतन वर्मा, पवन तळेकर, सुशील परदेशी, वर्षा आढाव व त्रिमूर्ती कलशेट्टी हे मंचीय मदतनीस व्यवस्था पाहणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...