Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रलंडनच्या वोकिंगमध्ये मराठमोळ्या स्रियांनी पारंपारिक पध्दतीने खेळला भोंडल्याचा खेळ

लंडनच्या वोकिंगमध्ये मराठमोळ्या स्रियांनी पारंपारिक पध्दतीने खेळला भोंडल्याचा खेळ

नाशिक | Nashik

नवरात्र म्हटलं की सर्वत्र चैतन्यमयी आणि उत्साहाचे पावित्र्याचे वातावरण असते. तसेच नवरात्रात (Navratri) आठवण येते ती गरबा, दांडियाची. पण महाराष्ट्रात भोंडला (Bhondla) ज्याला भुलाबाई किंवा हादगा असेही म्हणतात. हा उत्सव खास स्त्रियांसाठी साजरा होतो, वेगवेगळ्या क्षेत्रात याचे वेगवेगळे नावे आहेत. पण, भोंडल्याचा हाच सण केवळ महाराष्ट्रातपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राशी नाळ जोडलेल्या पण कामानिमित्त किंवा अन्य कारणांमुळे परदेशात स्थायिक झालेल्या मराठमोळ्या नागरिकांमध्येही साजरा केला जातो. असाच भोंडला हा उत्सव लंडनमधील वोकिंगमध्ये राहणाऱ्या मराठी स्रियांनी (Women) उत्साहात साजरा केला आहे.

- Advertisement -

हा सण आश्विन महिन्यात हस्त नक्षत्र लागल्यापासून सुरू होतो. हा अधिकतर महाराष्ट्रात आणि कोकणात प्रचलित असलेला सण असून या उत्सवात बायका, मुली समुदायाच्या रूपाने खेळ खेळतात. नवरात्राच्या नऊ दिवसात कधीही आपल्या सोयीनुसार हा खेळ खेळतात. घटस्थापनेपासून ते कोजागरीपर्यंत कधीही भोंडला करू शकतो. महाराष्ट्रातील (Maharashtra) परदेशात स्थायिक झालेल्या पुणे-नाशिक अनघा देशपांडे, नाशिक-नागपूरच्या प्राजक्ता नरसिंगकर, पुणे-आसामच्या शीतल दास, अहिल्यानगरच्या वृषाली जटाडे आणि मुंबईच्या तृप्ती बनकर या महिलांनी एकत्र येत लंडनमध्ये पारंपारिक पध्दतीने भोडंला साजरा केला.

आजकालच्या तरुण (Youth) पिढीला भोंडला, भुलाबाई, हदग्याचा विसर पडू नये, ही परंपरा पुढच्या पिढीकडून जोपासली जावी या उद्देश्याने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला.यासाठी त्यांनी हत्तीची प्रतिकृती ठेऊन आणि लक्ष्मीची मातेची विधिवत पुजा करत भोंडल्याच्या खेळाला सुरुवात केली. त्यानंतर लक्ष्मीच्या भोवती गोल रिंगण करून भोंडल्याच्या गाण्यावरती ताल धरत पारंपारिक गाण्यांवर नृत्य केले. यावेळी मनसोक्त हसून, गाणी गात आणि भरपूर आठवणी या महिलांनी जाग्या केल्या. त्यानंतर या महिलांनी डब्बे वाजवून खाऊ ओळखायचा छोटासा खेळ खेळला आणि नंतर एकमेकांना खाऊ भरवून अंगत-पंगत करत भोंडल्याची सांगता केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या