Wednesday, November 20, 2024
HomeनाशिकPhoto Gallery : बाऱ्हे येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा; शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

Photo Gallery : बाऱ्हे येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा; शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

मनखेड  | भागवत गायकवाड

सूरगाना तालुक्यातील आदिवासी भाग समजले जाणारे व डोंगराळ भागात वसलेले बार्हे हे गाव असून नुकत्याच बार्हे येथे पोलिस रेझिंग डे निमित्त (रण फॉर युनिटी) डॉ. आरती सिंह पाटील पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेने चला आपण धावूया या…एकता दौड़.आयोजक शर्मिष्ठा वालावलकर अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण बार्हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व या कार्यक्रमाचे खास प्रमुखपाहुणे कळवन उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे हे होते आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

- Advertisement -

ह्या स्पर्धेत लहान मोठे असे दोन गट केले होते. त्यामध्ये ५वी ते ७वी हा लहान गट तर ८ते १२वी मोठा गट केला होता आणि या अशा या स्वरूपाने हा कार्यक्रम ठिक आठ वाजता सुरू झाला या स्पर्धेला या भागातील आंबुपाडा, भेगू, मनखेड, अलंगुन, बार्हे, ठानगाव अशा अनेक शाळेने सहभाग घेतला होता आणि सर्व प्रथम लहान गटाला धावण्याची संधी दिली आणि प्रत्यक गटातून तिन नंबर काढले या नंतर विजयी खेळाडूंना त्यांचा गौरव व मार्गदर्शन करण्यासाठी  सर्वच विद्यार्थी शिक्षक व या परिसरातील ग्रामस्थ हे सर्व आयोजन स्थळी जमले व या ठिकाणी भव्य असा विजयी खेळाडूंचा सत्कार व आलेल्या प्रमूख पाहुणे यांचे मार्गदर्शन व त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.

या मध्य  ठानगाव बार्हे,आंबुपाडा(बे),भेगू,मनखेड,इत्यादि शाळेच्या विद्यार्थ्यांनि या मॅरेथॉन स्पर्धेत विजय संपादन करून आणि या प्रमूख मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्मुर्तीचिन्ह देवुन करण्यात आला व विजयी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या व या कार्यक्रमासाठि लाभलेले प्रमूख पाहुणे मा सदाशिव वाघमारे उप विभागीय अधिकारी कळवन यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की बार्हे सारख्या आदिवासी परिसरात अशा खरच या परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवते बरोबरच विविध खेळामध्ये सुध्दा ते हिरिहीरीने भाग घेतील व अशा या कार्यक्रमाच्या हेतूने या परिसरची ओळख सुध्दा होवू शकते आणि असे कार्यक्रम जर अशा आदिवासी भागात जर घेतले तर या भागातील विद्यार्थ्यांना अशा या कार्यक्रमाची ओढ लागेल म्हणून असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.

बार्हे पोलिस ठाण्याचे मा लोखंडे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात कसे राहिले पाहिजे व त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की हा जरी आदिवासी भाग असला तरी आम्ही यापुढे वेगवेगळे कार्यक्रम राबवू व असा दिलासा देत पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी या भागातील विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेश महाले सर यांनी केले व या स्पर्धेसाठी बार्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ चौधरी सर,डॉ गावित,मूंगसे दादा,बारगल दादा,योगीश्री गांगुर्डे वाणिता गावित,व बार्हे पोलिस स्टेशनचे कर्मचारी  वन विभागाचे वनपाल साळवे साहेब,व वन विभागाचे कर्मचारी तसेच अनुदानित माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीयार सर व स्पर्धेसाठी आलेले सर्व शिक्षकव्रुंद बार्हे परिसरातील सर्व उपस्थित प्रमूख मान्यवर या कार्यक्रमाला खास सहकार्य म्हणून युवा फाउंडेशन बार्हे येथील सुरेश महाले,मनोहर जाधव,हेमंत महाले,नामदेव पाडवी,मनोज देशमुख,पोलिस पाटील हुशार खांबाईत,पोलिस पाटील सुरेश कामडी व या परिसरातिल सर्व पोलिस पाटील व स्पर्धेला आलेले सर्व क्रीडा मार्गदर्शक आदी उपस्थित होते.

आम्ही या पुढे या भागात असे कार्यक्रम सदैव राबवू व या भागातील विद्यार्थ्यांमध्य चांगले गुण संपादन करण्यास आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहू
-राजेंद्र लोखंडे पोलीस सहायक निरीक्षक बार्हे पोलीस ठाणे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या