बीड | Beed
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. शेती खरडून गेली आहे. पिकांची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशातच राज्यातील मंत्रिमंडळ शेतीच्या बांधावर पोहचले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दोन दिवसापासून मराठवाडा दौऱ्यावर आहे. बुधवारी त्यांनी भुम-परांडासहीत सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील गावांना भेटी दिल्या. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास, अजित पवार भूम-परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द येथील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. मात्र, गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना धाराशीवमध्ये एका पूरग्रस्त शेतकऱ्याने नोंदवलेला आक्षेप ऐकून अजित पवार त्याच्यावर चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास, अजित पवार भूम-परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द येथील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. गावात जाऊन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, गावातील कुटुंबांची विचारपूस केली. शेतकऱ्यांची शेतं, नुकसानग्रस्त घरं आणि उध्वस्त झालेला संसार या साऱ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या. यावेळी वेगवेगळ्या गावातील गावकऱ्यांना धीर देत आपले सरकार शक्य त्या मार्गाने मदत करण्यासाठी ठोस पावले उचलत असण्याचा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिला. मात्र, शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय काढताच अजित पवारांचा पारा चढला.
पिकांचे पंचनामे जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांपर्यंत मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या, असे देखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले असल्याची माहिती अजित पवारांनी गावकऱ्यांना दिली. अजित पवार गावकऱ्यांशी संवाद साधत असतानाच एका शेतकऱ्याने आपली तक्रार मांडताना एक विधान केले. हे विधान अजित पवारांना चांगलेच खटले.
नेमकं अजित पवार काय म्हणाले?
एका तरुणाने त्यांना कर्जमाफीविषयी विचारले. त्यावेळी त्या तरुणाला उद्देशून दादांनी, “आम्हाला कळतं ना, आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय?” असा सवाल अजित पवारांनी संपातून माईकवरुनच विचारला. “सकाळी सहाला सुरु केलंय बाळा मी करमाळ्याला. जो काम करतो ना त्याचीच मारा,” असे अजित पवार चिडून म्हणाले. हे ऐकताच उपस्थित हसू लागले. त्यावर अजित पवारांनी सर्वांकडे पाहत, “बघा ना आता. एवढं जीव तोडून सांगतोय. मला अजूनही एका ठिकाणी जायचं आहे. आम्हालाही कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींनाच किती मदत करतोय. आज वर्षाला 45 हजार कोटींची मदत करतोय,” असेही सांगायला अजित पवार विसरले नाहीत.
आजपासून बीड दौऱ्यावर
आज सकाळी अजितदादा बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती केली. मुलं तुमच्या मोबाईलवर काय करतात याकडं लक्ष देण्यास सांगितले. एका महिलेचं उदाहरण देत तिचे सरकारी योजनेचे जमा पैसा मुलाने गेमिंगमध्ये गमावल्याचे त्यांनी सांगितले. तुमची मुलं काय करतात, काय नाही याकडं लक्ष द्या असं अजितदादा म्हणाले. संकट मोठं आहे आणि सरकार मदत करत असल्याचे ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




