अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात एकूण 305 कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे 625 उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. 10 ते 25 कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न असणार्या बाजार समिती अ वर्ग (चार तारांकित) मध्ये अहिल्यानगर बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. 5 ते 10 कोटींपर्यंत उत्पन्न असणार्या बाजार समिती अ वर्ग (तीन तारांकित) मध्ये राहुरी, नेवासा आणि राहाता बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे.
2.5 ते 5 कोटींपर्यंत उत्पन्न असणार्या बाजार समिती अ वर्ग (दोन तारांकित) मध्ये श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, शेवगाव, पारनेर, जामखेडचा समावेश आहे. 1 ते 2.5 कोटींपर्यंत उत्पन्न असणार्या बाजार समिती अ वर्ग (एक तारांकित) मध्ये श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत बाजार समित्यांचा समावेश आहे.
50 लाख ते 1 कोटीपर्यंत उत्पन्न असणार्या बाजार समिती अ वर्ग मध्ये अकोले बाजार समित्यांचा समावेश आहे