Friday, August 21, 2026
HomeनगरAhilyanagar : बाजार समित्यांचे सुधारित वर्गीकरण

Ahilyanagar : बाजार समित्यांचे सुधारित वर्गीकरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यात एकूण 305 कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे 625 उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. 10 ते 25 कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समिती अ वर्ग (चार तारांकित) मध्ये अहिल्यानगर बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. 5 ते 10 कोटींपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समिती अ वर्ग (तीन तारांकित) मध्ये राहुरी, नेवासा आणि राहाता बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

2.5 ते 5 कोटींपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समिती अ वर्ग (दोन तारांकित) मध्ये श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, शेवगाव, पारनेर, जामखेडचा समावेश आहे. 1 ते 2.5 कोटींपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समिती अ वर्ग (एक तारांकित) मध्ये श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत बाजार समित्यांचा समावेश आहे.
50 लाख ते 1 कोटीपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समिती अ वर्ग मध्ये अकोले बाजार समित्यांचा समावेश आहे

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...