अकोले |प्रतिनिधी| Akole
अल्पवयीन मुलीला घरातून पळवून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती ठेवल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
आकाश राजू उघडे (वय 30, विरगाव, ता. अकोले, मुळ रा. शेळकेवस्ती, नांदुरीदुमाला, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अकोले पोलिसांत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आकाश उघडे याने सदर मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. सदर पीडित मुलीच्या आईने तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला. विरगाव शिवारात एका शेतातील घरात ती मिळून आली.
त्यानंतर पीडित मुलीने सांगितले की, आकाश हा घरी यायचा व तु मला आवडेस, मी तुझ्याबरोबर लग्न करील, आपण कुठेतरी जाऊ असे म्हणून त्याने मला सहा महिन्यांपूर्वी पळवून आणले. त्यादरम्यान त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून मी गरोदर राहिले. त्यानंतर तु तुझ्या आईकडे घरी जायचे नाही, नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी पीडित मुलीला आकाश याने दिली.
याबाबत पीडित मुलीच्या आईने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आकाश राजू उघडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (ख) (छ), 376 (3), 366 (अ), 506 सह पोस्को 4, 5 (1) (2) उल्लंघन 6, 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी आकाश राजू उघडे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे करत आहेत.