Friday, October 2, 2026
HomeनगरCrime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

मध्यप्रदेशच्या तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी (29 सप्टेंबर) अत्याचार व पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ बाजदेव वर्मा (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

या प्रकरणी अहिल्यानगर शहरात राहत असलेल्या 16 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अहिल्यानगर शहरात राहते. संशयित सौरभ वर्मा याने सुमारे आठ महिन्यांपूर्वी तिच्याशी संपर्क साधला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मुलीला त्रास होत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिने कोतवाली पोलिसांना जबाब दिला आहे. त्या जबाबावरून सौरभ वर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, महिला सहायक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव यांनी पथकासह भेट दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीवास्तव तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....