Friday, February 6, 2026
Homeक्राईमलग्नाचे आमिष दाखवत शिक्षिकेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवत शिक्षिकेवर अत्याचार

तक्रार केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करणार्‍या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बांधकामाच्या साईटवर व इतर ठिकाणी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी करण भगवान राजपाल (रा. भिंगार, अहिल्यानगर) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने बुधवारी (4 डिसेंबर) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सन 2022 मध्ये फिर्यादीची इंस्टाग्रामवर करण सोबत ओळख झाली होती. त्याने 8 मे 2022 रोजी फिर्यादीला फोन करून आपल्याला फिरण्यासाठी जायचे असे सांगितले. तो फिर्यादीला घेण्यासाठी आला. त्याने फिर्यादीला त्याच्या सोबत घेऊन जात डिमार्ट बिल्डिंगच्या मागील एका कन्स्ट्रक्शन साईटवर नेले. तेथे त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्याने 3 नोव्हेंबर 2024 रोजी शहराजवळील एका डोंगर परिसरात नेऊन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले. त्यानंतर त्याने पीडितासोबत बोलणे बंद केले.

YouTube video player

तेव्हा पीडिताने त्याला 12 नोव्हेंबर रोजी लग्न करण्यासंदर्भात विचारणा केली असता त्यानंतर पीडितेस त्याने लग्न करायला नकार दिला. तुला काय करायचे ते कर, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तु जर माझी तक्रार केली तर मी तुझे फोटो व्हायरल करेल,अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...