Sunday, May 4, 2025
Homeक्राईमCrime News : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

Crime News : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शादी डॉटकॉम बेवसाईटवरून पीडित महिलेशी संपर्क साधत, तिला लग्नाचे आमिष दाखविले. घर घेण्यासाठी तिच्याकडून एक लाख 80 हजार रुपये घेतले. केडगाव येथे तिच्यावर अत्याचार करून पुन्हा पैशाची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने अत्याचाराचे व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

विनोद लल्लनसिंग रजपूत (रा. एकदंत कॉलनी, सारसनगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, पीडित महिला हावडा (पश्चिम बंगाल) येथील आहे. तिच्या पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याने तिने दुसरे लग्न करण्यासाठी शादी डॉटकॉम या वेबसाईटवर प्रोफाईल अपलोड केली. त्यामुळे विनोद रजपूत याने तिच्याशी संपर्क केला. त्यानेही दुसरे लग्न करायचे आहे, असे सांगितले. तो सतत पीडितेबरोबर फोनवर बोलत असे. त्यानंतर हावडा येथे पीडितेच्या घरी बोलणे झाले. तो नगरमध्ये काम करीत असून पेटिंगचा व्यवसाय असल्याचे त्याने सांगितले. नवीन घर घेतल्यानंतर लग्न करू, असेही तो म्हणाला.

नवीन घरासाठी त्याने एक लाख 80 हजार रुपये घेतले. दरम्यान, रजपूत 5 मार्च 2025 रोजी हावडा येथे आठ दिवस राहण्यासाठी होता. त्यामुळे त्यांचे चांगलेच प्रेमसंबध जुळले. त्यानंतर 1 एप्रिल 2025 रोजी पीडिता विनोदला भेटण्यासाठी हावडा येथून नगरला आली. केडगाव शास्त्रीनगर येथे भाड्याच्या घरामध्ये राहिली. याच काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा हावडा येथे गेले. विनोद घर घेण्यासाठी पुन्हा पैसे मागू लागला. त्यास नकार दिला असता त्याने अत्याचार केल्याचे व्हीडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने पुन्हा नगरला येऊन त्यास लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार दिला. उलट पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

डांबरी रस्त्याची तोडफोड, टेलिफोन केबल कंपनी विरुध्द गुन्हा दाखल

0
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan टेलिफोनची केबल टाकण्यासाठी नामांकित कंपनीच्या ठेकेदाराने परवानगी शिवाय नव्यानेच झालेल्या डांबरी रस्त्याची तोडफोड केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचनामा करुन श्रीरामपूर तालुका पोलिसात...