Wednesday, May 29, 2024
Homeनगरलग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मामाच्या गावी आलेल्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून एका युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत रमेश राठोड (रा. पत्र्याचा तांडा, तालुका पाथर्डी या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये वीस वर्षाची पीडित तरुणी मामाच्या गावी आली होती, तेव्हा अनिकेत याच्याशी तिची ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले. आपण दोघे लग्न करणार आहोत असे आमीष दाखवून अनिकेत राठोड याने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. या काळात अनिकेत याने तरुणीला मोबाईल, अंगठी अशा भेटवस्तू दिल्या. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्यराम निरंजन वाघ करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या