Friday, February 6, 2026
Homeक्राईमविवाहितेवर अत्याचार करुन पाच लाखांना घातला गंडा

विवाहितेवर अत्याचार करुन पाच लाखांना घातला गंडा

संगमनेर शहर पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

32 वर्षीय महिलेची एका तरुणासोबत तोंड ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत होऊन वारंवार अत्याचार केला. शिवाय 5 लाख 748 रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना 16 मे, 2022 ते 12 जानेवारी, 2025 पर्यंत घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी ओमकार नामदेव सोनवणे (रा. रहाणेमळा, ता. संगमनेर) या तरुणावर बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पीडित महिलेचा हॉटेल व मेसचा छोटासा व्यवसाय आहे. तिच्या घरासमोर आरोपीचे चुलते राहत असल्याने आरोपी ओमकार सोनवणे हा नेहमी तेथे येत होता. त्यामुळे त्याची महिलेशी तोंडओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. 16 मे, 2022 रोजी सोनवणे याने पीडित महिलेला घरी बोलवले. घरी कोणीच नसल्याने तिचा विरोध झुगारून त्याने अत्याचार केला. यावरून सोनवणे हा तिला वारंवार ब्लॅकमेल करू लागला. पीडित महिलेच्या मुलीच्या नावाने तर कधी प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्‍याला सांगेल, अशा धमक्या देऊन नांदूर शिंगोटे येथील लॉजवर आणि आरोपी सोनवणे याच्या राहत्या घरी वारंवार अत्याचार केला.

YouTube video player

याचदरम्यान, ऑक्टोबर 2022 मध्ये मला कार घ्यायची असल्याने मला पैसे दे नाही दिले तर तुझ्या नवर्‍याला आपले प्रेमसंबंध आहे असे सांगेन. तेव्हा पीडितेने कार घेण्यासाठी 4 लाख 898 रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर पुन्हा डिसेंबर 2023 मध्ये मला गाडीचा विमा भरायचा असे सांगून पैशांची मागणी केली. त्यावर पीडितेने 8 ग्रॅमचे मंगळसूत्र बँकेत गहाण ठेऊन पैसे दिले. त्याने पुन्हा गाडीचा हप्ता भरण्यासाठी पीडित महिलेकडून मार्च 2024 मध्ये तीन तोळ्यांची पोत बँकेत गहाण ठेऊन 59 हजार 850 रुपये घेतले. याशिवाय तिच्या घरी जाऊनही अत्याचार करत राहिला.

दरम्यान, 12 जानेवारी, 2025 रोजी दुपारी पीडितेच्या घरी कोणी नसताना अत्याचार करत माझ्या भावाचे लग्न आहे म्हणून 40 हजार रुपये ऑनलाईन घेतले. वारंवार होणार्‍या या त्रासाला कंटाळून पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. यावरून शहर पोलिसांनी ओमकार नामदेव सोनवणे याच्यावर बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरातील इराणी गल्लीत नशेच्या गोळ्या

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरातील इराणी गल्ली येथे एका 24 वर्षीय महिलेस अवैधरित्या कोणतीही वैद्यकीय शिफारस नसताना नशेच्या नायट्रोझेपमच्या गुंगीकारक गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी श्रीरामपूर...