नवापूर | श प्र. NAVAPUR
व्यवसायासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला, वेळोवेळी होणाऱ्या मारहाण व मानसिक छळास कंटाळुन विवाहित महिलेने (Married woman) शहरातील मुसलमान मोहल्ला येथील राहत्या घरी काल दुपारी पावणे दोनच्या सुमारास पंख्याला ओढणी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या (suicide) केली. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हलीमा मोईन शेख (वय २४ वर्षे) या विवाहितेने तिच्या माहेरून व्यवसायासाठी पैसे आणावे यासाठी नेहमी त्रास दिला जात होता. वेळोवेळी होणाऱ्या मारहाण व मानसिक छळास कंटाळुन काल दिनांक १ जानेवारीला राहत्या घरी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पंख्याला ओढणी बांधुन गळफास घेवुन हलीमा मोईन शेख यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत गुलफान सुलतानशेख ( वय ४२ वर्ष मोहम्मदीया चौक निमझरी रोड शिरपुर जि. धुलीया) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाहितेचा पती मोईन शेख रहेमान, सासरा रहेमान शेख, सासु निखत रहेमान शेख (मुसलमान मोहल्ला नवापूर), नणंद शाईन (राहणार, सोनगड जि तापी ) यांच्याविरुद्ध 306, 498(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करत आहेत.