Thursday, July 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविवाहितेची आत्महत्या; माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर केला मयत महिलेचा अंत्यसंस्कार

विवाहितेची आत्महत्या; माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर केला मयत महिलेचा अंत्यसंस्कार

चांदवड | प्रतिनिधी Chandvad

- Advertisement -

तालुक्यातील पिंपळगाव दाबळी येथील विवाहिता मोहिनी चंद्रकांत आहिरे, वय- २१ वर्ष हिने सासरच्या ज्याचास कंटाळून गळफास घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत तिचे वडील धोंडीराम प्रभाकर गायकवाड व्यवसाय शेती, रा. दहिवद, बेघर वस्ती, ता. चाळीसगाव, जि, जळगाव. यांनी फिर्याद दिल्याने सासरच्या ६ मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे वडील धोंडीराम प्रभाकर गायकवाड यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची मुलगी मोहिनी हिचा विवाह चांदवड तालुक्यातील पिंपळगाव दाबळी येथील चंद्रकांत प्रकाश आहिरे यांच्याशी झाला होता.डिसेंबर २०२४ ते दि. ७ नोव्हेंबर २५ दरम्यान सासरचे संशयित पती चंद्रकांत प्रकाश आहिरे, सासू अनिता प्रकाश आहिरे, सासरा प्रकाश जग्गाजी आहिरे, भाया संदिप प्रकाश आहिरे, जाऊ सौ. सरिता संदिप आहिरे, नणंद पुजा प्रकाश आहिरे सर्व रा. पिंपळगाव धाबळी,आहिरे वस्ती ता. चांदवड, जि. नाशिक यांनी फिर्यांदीची मुलगी मयत मोहिनी हिस वेळोवेळी गाडी व मोबाईल फोन विकत घेण्यासाठी तुझे माहेरुन पैसे घेवुन ये, तुझे आई बाप भिकारी आहेत, त्यांनी तुझे लग्नात काही दिले नाही, तुझ्या आई बापाकड़न घरसंसाराचे सामान घेवुन ये, या कारणाची कुरापत काढून टोचून बोलून व शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करत असल्याने त्या नेहमीच्या त्रासाला कंटाळन फिर्यादीची मयत मुलगी मोहिनी चंद्रकांत आहिरे, हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने शनिवार दि ८ रोजी राहते घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याने मयताचे वडील धोंडीराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान माहेरच्या नातेवाईकांनी मयत मोहिनी चा अंत्यसंस्कार सासरच्या घरासमोर केला.यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र चांदवड पोलिसांनी परिस्थिती वर नियंत्रण ठेवल्याने पुढील अनर्थ टळला.या घटनेत मयत मोहिनीचा नवरा,सासू, सासरा,भाया, जाऊ व नणंद यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार दि ११ पर्यत पोलीस कोठडी सुन्यावण्यात आली आहे.या घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....