Monday, January 26, 2026
Homeक्राईमNashik News: शेततळ्यात बुडून विवाहितेचा मृत्यू

Nashik News: शेततळ्यात बुडून विवाहितेचा मृत्यू

सुरगाणा | वार्ताहर
वणी-सुरगाणा रस्त्यावर उमरेमाळ येथे घरालगत असलेल्या शेततळ्यात नवविवाहितेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. माहेरच्या नातेवाईकांनी हा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सुरगाणा तालुक्यातील उमरेमाळ येथील कावेरी (२०) हिचा योगेश जाधवबरोबर मे महिन्यात विवाह झाला होता. योगेश हा नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत होता. २५ जून रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास गावातील दिलीप देशमुख यांना एका महिलेचा मृतदेह शेततळ्यात तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ हट्टी येथील पोलीस पाटील मधुकर चौधरी यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले. पोलीस पाटील यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता शेततळ्याच्या २५ ते ३० मीटर अंतरावर घर असलेली विवाहिता कावेरी योगेश जाधव हिचा हा मृतदेह असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांना कावेरीच्या वहीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात लिहिले आहे की, कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा त्रासामुळे नाही तर मी स्वतः माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. माझ्या मृत्यूला स्वतः जबाबदार आहे. असा मजकूर चिठ्ठीत असून पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे.

- Advertisement -

कावेरीचे शिक्षण डी.टी.एड. पूर्ण झाले असून नुकतीच शिक्षक पात्रता परीक्षा तिने दिली होती. चिठ्ठीतील तिचे हस्ताक्षर व सहीची खातरजमा पोलीस करत आहेत. चिठ्ठीतील हस्ताक्षर तसेच सही तिची नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पती योगेश जाधव यास मुंबई येथून येण्यास उशीर झाल्याने साडेपाच वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. बंदीपाडा येथील नातेवाईकांनी पती योगेशला शव ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊ देणार नाही अशी मागणी केली. त्यामुळे उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कावेरीचा मृत्यू नेमका कसा झाला, चिठ्ठीतील हस्ताक्षर तिचेच आहे का?, शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांचे मत आहे. तर उमरेमाळ येथे या घटनेमुळे तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे, तुळशीराम चौधरी, भास्कर भोये आदी करत आहेत.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...