अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा सासरी छळ करण्यात आलाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती एडविन इस्त्राईल मंत्री, सासरा इस्त्राईल मंत्री, सासू रिबेका इस्त्राईल मंत्री व सौनिया इस्त्राईल मंत्री (सर्व रा. सुभाषनगर, घुग्घूस ता.जि. चंद्रपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरचा प्रकार 13 फेब्रवारी 2022 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला आहे. फिर्यादी महिलेचे माहेर कानडे मळा, सारसनगर (नगर) असून त्या सध्या माहेरी राहत आहेत.
त्या सासरी नांदत असताना पतीसह चौघांनी त्यांच्याकडे संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी माहेरून तीन लाख रूपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांचा मानसिक व शारिरीक छळ करून कु्ररपणाची वागणूक दिली. पैसे घेऊन न आल्याने शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी करून घराच्या बाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जी.बी.नागरगोजे करीत आहेत.