Monday, June 24, 2024
Homeनगरविवाहितेला फिनेल पाजून बाथरूममध्ये कोंडले

विवाहितेला फिनेल पाजून बाथरूममध्ये कोंडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. तसेच फिनेल पाजून बाथरूम मध्ये कोंडून घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने शनिवारी (दि. 9) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती चेतन भारत शिंदे, सासरे भारत शिंदे, सासू आंबुबाई भारत शिंदे, रवींद्र आंधळे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. पुणे), नणंद धनश्री अभिजित भोसले व तिचा पती अभिजित भोसले (दोघे रा. कोल्हापुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 14 मे 2022 रोजी फिर्यादीचा विवाह चेतन शिंदे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर फिर्यादीला सात ते आठ दिवस चांगले नांदवले. त्यानंतर तिचा छळ सुरू झाला.

लग्नातील मानपानावरून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच 15 मे 2023 रोजी रात्री सासूने बाथरूममध्ये ढकलून देत फिनेल पाजले. तु मर, असे म्हणून बाथरूम मध्येच कोंडून घेतले. दरम्यान, फिर्यादीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना पोलिसांना वेगळा जबाब देण्यासाठी दम दिला. यामुळे फिर्यादीने वेगळा जबाब दिला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून अंगावरील चार तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भरोसा सेलकडे तक्रार दिल्यानंतरही समझोता न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या