Tuesday, May 21, 2024
Homeनगरविवाहितेवर तरुणाकडून अत्याचार

विवाहितेवर तरुणाकडून अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. 13) रात्री नगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम संजय वाणी (रा. मोहटादेवी मंदिराजवळ, कल्याण रस्ता) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी रविवारी रात्री घरासमोर पतीची वाट पाहत उभ्या असताना वाणी तेथे आला. त्याने फिर्यादीकडे त्यांच्या पतीविषयी चौकशी केली व चल मी तुला माझे घर दाखवितो, असे म्हणून त्याच्या दुचाकीवरून घरी नेले. फिर्यादीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून बळजबरीने अत्याचार केला असल्याचे पीडितीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पीडितेने वाणी याच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले.

घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी विक्रम वाणी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या