Thursday, November 14, 2024
Homeक्राईमपतीला चॅटिंग पाठविण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

पतीला चॅटिंग पाठविण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

पीडितेच्या फिर्यादीवरून युवकाविरूध्द पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेसोबत केलेली चॅटिंग पतीला पाठविण्याची व आत्महत्या करण्याची धमकी देत युवकाने विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी (17 जुलै) एमआयडीसी पोलीस ठाण्यात युवकाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेमंत अशोक सैनी (वय 19 रा. भोर कॉलनी, छप्पनभोग हॉटेलच्या समोर, बोल्हेगाव फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. मे 2024 ते 12 जुलै 2024 च्या दरम्यान वेळोवेळी ही घटना घडली आहे. 30 वर्षीय विवाहितेसोबत हेमंत सैनी याची ओळख होती. ओळखीतून त्यांच्यात सोशल मीडियावर चॅटिंग सुरू होते. दरम्यान, केलेले चॅटिंग पतीला पाठविण्याची तसेच स्व: ता आत्महत्या करण्याची धमकी देत विवाहिता घरी एकटी असताना तिच्यावर बळजबरीने शारिरीक संबंध ठेऊन अत्याचार केला.

याबाबत पीडित विवाहितेने पतीला माहिती दिली व 17 जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हेमंत सैनी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपअधीक्षक संपत भोसले, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक परदेशी यांनी भेट दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या