Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमनैसर्गिक विधीसाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार

नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहराजवळील एका गावच्या शिवारात ज्वारीच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या तीसवर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शहराजवळील एका गावच्या शिवारात तीसवर्षीय विवाहित तरुणी ज्वारीच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी गेली होती.

- Advertisement -

त्याचवेळी तेथे कोणी नसल्याचा फायदा घेत नामदेव मच्छिंद्र चव्हाण (वय 33, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) याने महिलेला पाठीमागून मिठी मारून तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध केले. सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकेल अशी धमकीही दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या नातलग महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नामदेव चव्हाण याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या