Saturday, May 17, 2025
Homeक्राईमCrime News : दोन लाखासाठी विवाहितेची हत्या

Crime News : दोन लाखासाठी विवाहितेची हत्या

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

- Advertisement -

नेवासा (Newasa) तालुक्यातील माका येथे एका विवाहित महिलेचा गळा आवळून खून (Married Woman Murder) झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की पुजा अशोक गोरे (वय 22) हिचा विवाह चार वर्षापूर्वी माका (Maka) येथील अशोक अर्जुन गोरे याच्याशी झाला होता. काही दिवस सासरच्या मंडळींनी सुखाने नांदवले. परंतु तू तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ (Torture) तिचे सासरची मंडळी करु लागले. दि. 15 रोजी सकाळी 11 ते दि. 16 रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी घरातून निघून गेल्याने तीला गळा आवळून जिवे ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी माका शिवारात पाटाच्या पाण्यात टाकून दिला असल्याचे गणेश मच्छिंद्र एडके (रा. मुथलवाडी ता. पैठण) यांनी दाखल फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

दि. 17 रोजी सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) अशोक अर्जुन गोरे, पांडुरंग अर्जुन गोरे रा. माका यांचे विरुद्ध गुन्हा र. नं. 193/2025 बीएनएस चे कलम 103 (1), 238, 84, 115 (1), 352, 351 (1), (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे तसेच उपनिरीक्षक काकासाहेब राख यांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी करत आरोपींना तातडीने ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ज्योती

Who Is Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi हरियाणातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसारची रहिवासी असलेली ज्योती मल्होत्राला कैथल...