Wednesday, October 21, 2026
Homeक्राईमCrime News : महिला वॉशरूममध्ये शिरून विवाहितेवर अत्याचार

Crime News : महिला वॉशरूममध्ये शिरून विवाहितेवर अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

उपनगरातील एका कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या महिला वॉशरूममध्ये शिरून एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (15 सप्टेंबर) रात्री घडली. याप्रकरणी पीडित महिलेने (वय 22) बुधवारी (16 सप्टेंबर) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून देविदास खराद (रा. शनिधाम रोड, भारत बेकरीच्या मागे, बोल्हेगाव) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीच्या कुटुंबाचा कपड्यांचा व्यवसाय असून उपनगरातील कॉम्प्लेक्समध्ये महिलांच्या कपड्यांचे दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्था आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास महिला तिच्या सासूसोबत कपड्यांच्या दुकानात काम करीत होती. यावेळी ती कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या महिला वॉशरूममध्ये गेली. वॉशरूममध्ये प्रवेश करून दरवाजा बंद करीत असतानाच देविदास खराद याने दरवाजा ढकलून आत प्रवेश केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर त्याने वॉशरूमचा दरवाजा आतून बंद करून महिलेचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर काही वेळाने महिलेचा पती व दीर तेथे आले. त्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडला. दरवाजा तुटल्यानंतर संशयित तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पकडले. मात्र, हाताला झटका देऊन संशयित पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ना. राम शिंदे यांनी दुसर्‍यांदा घेतली ज्येष्ठ नेते यशवंतराव...

0
अहिल्यानगर/ सोनई |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला असून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख...