Monday, October 19, 2026
Homeक्राईमCrime News : पैसे देण्याच्या बहाण्याने विवाहितेला लॉजवर नेऊन अत्याचार

Crime News : पैसे देण्याच्या बहाण्याने विवाहितेला लॉजवर नेऊन अत्याचार

पतीला जीवे मारण्याची धमकी || पाथर्डीच्या तरूणावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

हातउसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने 19 वर्षीय विवाहितेला माळीवाडा बसस्थानक येथे बोलावून दुचाकीवरून चास (ता. अहिल्यानगर) गावच्या शिवारातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, यासंदर्भात पीडित विवाहितेने सोमवारी (10 ऑगस्ट) रात्री अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दत्तात्रय रघुनाथ ठोकळ (रा. जवखेड, ता. पाथर्डी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवाहिता मुळची शेवगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून त्या सध्या अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहत आहे. संशयित आरोपीकडून हातउसने घेतलेले पैसे परत घेण्यासाठी त्याने फिर्यादीला 19 जुलै रोजी माळीवाडा बसस्थानक येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर संशयित आरोपीने तिला आपल्या दुचाकीवर बसवून अहिल्यानगर-पुणे मार्गावरील चास गावच्या शिवारात असलेल्या लॉजिंगवर नेले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित लॉजमध्ये संशयित आरोपीने तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केला. त्यानंतर घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या पतीला मारून टाकण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडितेने सोमवारी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करीत आहेत.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...