Tuesday, July 16, 2024
Homeनगरसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे सासरी नांदत असताना पतीसह सासू व दिराने वारंवार केलेल्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. संभाजी राघू रोहोकले (रा. भाळवणी ता. पारनेर) यांची मुलगी अनिता हिचा विवाह पिंपळगाव उज्जैनी येथील मच्छिंद्र पाराजी वाघ याच्यासोबत झालेला होता.

अनिता ही सासरी नांदत असताना तिचा पती मच्छिंद्र, सासू नंदा पाराजी वाघ, दीर गोरख पाराजी वाघ यांनी तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करून तिला मारहाण केली. या छळास कंटाळून तिने राहत्या घरी शुक्रवारी (दि.25) दुपारी दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रोहोकले यांनी सोमवारी सायंकाळी (दि.28) एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत अनिता वाघ हिचा पती, सासू व दिरा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या