Saturday, June 7, 2025
Homeक्राईमCrime News : विवाहित महिलांचा छळ; दोन गुन्हे दाखल

Crime News : विवाहित महिलांचा छळ; दोन गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विवाहित महिलांवर सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, यासंदर्भात तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनुक्रमे दोन महिलांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणांमध्ये संबंधित सासरच्यांविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

तपोवन रस्ता परिसरात राहत असलेल्या एका महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रवीण राजेंद्र गाढवे, सासु प्रमिला राजेंद्र गाढवे, सासरा राजेंद्र विठ्ठल गाढवे, दीर शुभम राजेंद्र गाढवे, जाव कावेरी राजेंद्र गाढवे (सर्व रा. वाळुंज पारगाव, सोलापूर रस्ता, ता. अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा विवाह 30 मार्च 2024 रोजी प्रवीण गाढवे याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस सर्व सुरळीत असले तरी नंतर पती, सासू-सासरे, दिर आणि जाऊ यांनी सात लाख रूपयांच्या हुंड्याची मागणी करत मारहाण, शिवीगाळ व उपाशी ठेवून मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. फिर्यादी गर्भवती असतानाही त्रास दिला गेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

मुकुंदनगर येथील महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती मोहंमद ईस्माईल अब्दुल कादीर, सासु रजियाबानो अब्दुल कादिर, भाया मोहंमद खुणमीर ऊर्फ नुसरत, ननंद तहुरा बानो अब्दुलकादीर, मावस सासु मेहदिया नईम, मामे सासरे मोहंमद सुबान ऊर्फ बाबा (सर्व रा. हैद्रबाद) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांच्याकडे पाच लाख रूपयांची मागणी केली. तसेच लग्नात मानपान न केल्याचा राग, भांडीकुंडी व स्वयंपाकात त्रुटी असल्याच्या कारणांवरून वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Corona Virus : सावधान! करोना वाढवतोय टेन्शन; भारतात रुग्णांची संख्या ५०००...

0
दिल्ली । Delhi भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी (६ जून) देशभरात ५,००० हून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद...