Sunday, September 13, 2026
Homeक्राईमCrime News : चारचाकीसाठी पैसे, पाच लाखांची मागणी अन् चारित्र्यावर संशय

Crime News : चारचाकीसाठी पैसे, पाच लाखांची मागणी अन् चारित्र्यावर संशय

विवाहितांच्या छळाच्या दोन घटना उघड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विवाहित महिलांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, शेतजमीन विकण्याचा दबाव, तसेच चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या नातेवाईकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पहिल्या घटनेत, बोल्हेगाव परिसरात राहणार्‍या एका 26 वर्षीय विवाहितेचा चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणावेत तसेच वडिलांची गावाकडील शेतजमीन विकून टाकावी, या मागणीसाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी (23 मे) दिलेल्या फिर्यादीवरून पती देविदास बाबूराव गाडे, सासू मीरा बाबूराव गाडे, नणंद ज्योती किरण भालेराव, किरण राम भालेराव (सर्व रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा), दुसरी नणंद जया भगवान मिरपगार व भगवान दत्तात्रय मिरपगार (दोघे रा. मिरी, ता. पाथर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत, सध्या नागापूर परिसरात राहत असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. त्यांनी शनिवारी (23 मे) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती सतीश ज्ञानेश्वर लोखंडे, सासू व्दारकाबाई ज्ञानेश्वर लोखंडे, सासरे ज्ञानेश्वर एकनाथ लोखंडे, भाऊ शिवाजी ज्ञानेश्वर लोखंडे, जाऊ सरला शिवाजी लोखंडे (सर्व रा. बोकुडजवळगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) नणंद सुनंदा स्वप्निल आडसुळे व स्वप्निल सुनील आडसुळे (दोघे रा. वाळुंज, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सासरी बोकुडजळगाव येथे नांदत असताना त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच माहेरहून पाच लाख रूपये आणण्याच्या मागणीसाठी छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

हॉकी ज्युनियर आशिया कप २०२६ : हॉकीमध्ये भारताचा ‘डबल धमाका’; महिला-पुरुष...

0
दिल्ली | वृत्तसंस्था : भारतीय हॉकीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद...