Wednesday, June 19, 2024
Homeनगरविवाहितेचा छळ करणार्‍या सात जणांविरूध्द गुन्हा

विवाहितेचा छळ करणार्‍या सात जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मुलीच्या शिक्षणाकरिता व बाळंतपणात झालेला खर्च माहेरहून घेऊन येण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर शहरातील परदेशी गल्लीत राहणार्‍या पीडित विवाहितेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती विश्वास प्रमोद कुंदेन, सासू ताराबाई प्रमोद कुंदेन (दोघे रा. भवानी पेठ, कामगार मैदान, पुणे), मोठी नणंद श्रध्दा किरण मिठापेल्ली, मोठी नंदवा किरण अरुण मिठापेल्ली (दोघे रा. एडिकेम चौक, भवानीपेठ, पुणे), लहान नणंद स्मिता गणेश बोद्दुल, लहान नंदवा गणेश गंगाधर बोद्दुल (दोघे रा. भवानी पेठ, कामगार मैदान, पुणे), शिवाजी नारायण वन्नम (रा. त्रिशुल पटांगण, तोफखाना, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या