Tuesday, January 6, 2026
Homeनगरपैशांसाठी दोन विवाहितांचा सासरी छळ

पैशांसाठी दोन विवाहितांचा सासरी छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेचा सासरी छळ केल्याचे अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहे. पती – पत्नीत समझोता करण्याचा प्रयत्न येथील भरोसा सेलकडून केला जात आहे. मात्र समझोता न झाल्यास गुन्हा दाखल केला जात आहे. दोन विवाहितांचा सासरी छळ झाल्याप्रकरणी तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात रविवारी (14 जुलै) गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

सध्या सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती शुभम उदय देवनपल्ली, सासरे उदय रामदास देवनपल्ली, सासु अनुराधा उदय देवनपल्ली, दीर यश उदय देवनपल्ली (सर्व रा. सिन्नर, जि. नाशिक) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना पतीसह सासरच्यांनी मानसिक, शारिरीक त्रास देऊन छळ केला. कार घेण्यासाठी 10 लाख रूपये माहेरहून घेऊन येण्याची मागणी करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तेथे समझोता न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

हल्ली बुरूडगाव (ता. नगर) येथे राहत असलेल्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती चंद्रकांत अनिल गायकवाड, सासू लता अनिल गायकवाड, सासरे अनिल रतन गायकवाड (सर्व रा. भेंडा, ता. नेवासा) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर फिर्यादी सासरी भेंडा व पुणे येथे नांदत असताना त्यांना पतीसह सासरच्यांनी मानसिक, शारिरीक त्रास देऊन छळ केला. भविष्याच्या खर्चासाठी दोन लाख रुपये माहेरहून घेऊन येण्याची मागणी करून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...