Tuesday, April 28, 2026
Homeक्राईमविवाहितेचा छळ करणार्‍या सहा जणांविरूध्द गुन्हा

विवाहितेचा छळ करणार्‍या सहा जणांविरूध्द गुन्हा

पीडितेची कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्न व्यवस्थित लावून दिले नाही, लग्नात चारचाकी वाहन दिले नाही म्हणून विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या झेंडीगेट येथे राहत असलेल्या पीडित विवाहितेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पती शाहीद सय्यद मुनीर, सासू शफीया सय्यद मुनीर, सासरे मुनीर हबीब सय्यद, दीर हसन मुनीर सय्यद, मजाहिंद मुनीर सय्यद (सर्व रा. कुर्ला-अंधेरी रस्ता, जरीमरी एअरपोर्ट जवळ, मुंबई) व फतिमा मुन्ना शेख (रा. जिंतुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना 20 जुलै 2022 पासून ते 20 जानेवारी 2024 दरम्यान फिर्यादीच्या सासरी मुंबई येथे घडली. बुधवारी (28 ऑगस्ट) दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा विवाह शाहीद मुनीर सय्यद सोबत झाल्यानंतर त्या सासरी नांदत असताना त्यांना संशयित आरोपी यांनी तुझ्या वडिलांनी लग्न व्यवस्थित लावून दिले नाही.

लग्नात चारचाकी वाहन दिले नाही, असे बोलून उपाशीपोटी ठेवले. शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. शारिरीक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी सुरूवातीला भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. तेथे तडजोड न झाल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार इनामदार करत आहेत.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...