Friday, May 24, 2024
Homeनाशिकवावीत डेंग्यूने विवाहितेचा मृत्यू

वावीत डेंग्यूने विवाहितेचा मृत्यू

वावी | वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील वावी येथील नूतन ऋषिकेश मराळे या 21 वर्षीय महिलेचा डेंगू आजाराने मृत्यू झाला आहे. सिन्नर येथे तात्पुरता इलाज करून नाशिक येथे खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. वावी परिसरात डेंगूसदृश्य आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आठवड्यांपासून आढळून येत आहेत. त्यापैकी अनेकांना डेंगू आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी नूतन मराळे यांना अगोदर स्थानिक पातळीवर व त्यानंतर सिन्नर व नाशिक येथे वैद्यकीय उपचार देण्यात आले, मात्र स्थानिक पातळीवर आजाराचे वेळीच योग्य निदान झाले नसल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

सिन्नर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा रक्तदाब कमी होऊ लागला होता, त्यामुळे नाशिकला दोन दिवसांपूर्वीच तिला दाखल करण्यात आले होते, तेथे रक्त तपासणी केल्यानंतर डेंगू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते, शुक्रवार दि.15 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी नूतनचा विवाह वावी येथील भांड्याचे प्रसिद्ध व्यापारी सुदामशेठ मराळे यांच्या मुलासोबत झाला होता. गेल्या आठवड्यांपासून डासांचा उपद्रव वावी गावात वाढला आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे

गेल्या आठवड्यात डेंगूचा पहिला रुग्ण निष्पन्न झाल्यावर आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले मात्र ते केवळ दिखाव्यापुरते होते. गावात अंदाजे दहा ते बारा डेंगूचे आणखी रुग्ण असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत स्थानिक आरोग्य विभाग अंधारात आहे.ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने डास प्रतिबंधक मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वावी येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सकाळी दहा वाजता हजेरी लावून सायं.चार वाजता आपली ड्युटी सोडून गायब होणे असाही असे प्रकार सध्या सुरू आहे याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ मुख्यालय राहण्याचे आदेश पारित करावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या