Sunday, April 27, 2025
Homeक्राईममाहेरहून पैसे आणण्यासाठी दोन विवाहितांचा सासरी छळ

माहेरहून पैसे आणण्यासाठी दोन विवाहितांचा सासरी छळ

पीडितांच्या फिर्यादीवरून 20 जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दोन विवाहितांचा सासरी छळ केल्या प्रकरणी त्यांच्या पतीसह सासर्‍यांविरूध्द तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही विवाहितांचा वाहन खरेदीसाठी पैसे आणावेत म्हणून सासरच्यांनी छळ केला असल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या 10 जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अनिल शिवराम पालवे, सासू शशिकला शिवराम पालवे (दोघे रा. देवराई, ता. पाथर्डी), नणंद सुनीता विजय बडे, नणंदेचा पती विजय तुळशीराम बडे (दोघे रा. लक्ष्मीहिवरा, ता. पाथर्डी), नणंद सविता संभाजी डोंगरे, नणंदेचा पती संभाजी सीताराम डोंगरे (दोघे रा. घाटशिरस, ता. पाथर्डी), कविता उत्तम शिरसाठ, तिचा पती उत्तम शिरसाठ (पूर्ण नाव नाही, दोघे रा. टप्पा पिंपळगाव, ता. पाथर्डी), संगीता दीपक बुधवंत, तिचा पती दीपक बुधवंत (पूर्ण नाव नाही, दोघे रा. शिरापूर, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

नवीन चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी कोठला भागात राहणार्‍या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून 10 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शाकीर शब्बीर मनियार, सासू जैनब्बी मनियार (रा. मुनोली, कोकणगाव, ता. संगमनेर), नणंद तब्बसुम असीफ अत्तार, नंदवा असीफ अब्दुल्ला अत्तार (रा. नेहरू चौक, भिंगार), समीना साजीद मनियार, साजीद सिकंदर मनियार (रा. अकोला वेस ता. संगमनेर), दीर अल्ताफ शब्बीर मनियार (रा. कोकणगाव ता. संगमनेर), फरीद उर्फ लाला कादरभाई मनियार (रा. घास बाजार रस्ता, संगमनेर), आत्या दीर गुलफाम उर्फ छोटू गणीभाई मनियार (रा. साकूर ता. संगमनेर), मामा सासरा हुसेन भाई मनियार (रा. निमोन रस्ता, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “एकही पाकिस्तानी नागरिक…”; CM फडणवीसांचे मोठे विधान, नेमकं...

0
पुणे | Pune  देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तानी लोकांना (Pakistani People) देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना...