Friday, December 6, 2024
Homeजळगावभुसावळात केमिकल फॅक्टरीत भीषण आग

भुसावळात केमिकल फॅक्टरीत भीषण आग

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

शहरालगत कन्हाळा शिवारात असलेल्या एमआयडीसी परीसरातील जेबीएन (JBL in MIDC area) या ज्वलनशील ऑईल बनविणार्‍या (प्लॉस्टीक पॅरालिसीस ऑईल) (Plastic paralysis oil) कंपनीत मेंटेनन्स (दुरुस्ती) काम सुरू असतानाच अचानक शॉर्टसर्किट (Short circuit) होवून कॉम्प्रेसरने पेट घेतल्यानंतर आग (Fire) लागल्याची घटना मंगळवार, दि.11 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे 50 लाखांवर नुकसान (Damage) झाल्याचा अंदाज आहे. भुसावळ पालिकेसह दीपनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

- Advertisement -

ऑईल फॅक्टरी मेंटेनन्सचे काम मंगळवार, दि.11 रोजी सकाळी 9 वाजेपासून आठ कर्मचार्‍यांकडून सुरू करण्यात आले होते. मात्र अचानक वीज प्रवाह असलेली वायर तुटून ती ऑईल असलेल्या भागात शॉर्ट सर्किट झाले. मात्र अशाही परिस्थितीत मजुरांनी अग्निरोधक सिलिंडरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने वेळीच कर्मचार्‍यांनी सर्तकता दाखवत फॅक्टरी बाहेर पाय काढल्याने कुणीही जखमी झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी सकाळी कंपनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्यावर परिसरातील सुज्ञ नागरीकांनी भुसावळ नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला त्वरीत माहिती कळविली. त्यानुसार त्वरीत दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली. समजलेल्या माहीतीनुसार रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या