Tuesday, October 22, 2024
Homeदेश विदेशइमारतीला लागली भीषण आग; ४० जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

इमारतीला लागली भीषण आग; ४० जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कुवेतमधल्या दक्षिणेकडील मंगफ शहरात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात ५ भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. लागलेली आग एवढी भीषण हेती की, ती काही वेळातच मोठ्या प्रमाणावर पसरली.

या इमारतीत सर्व रहिवाशी एकाच कंपनीमधील कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी या कामगारांच्या इमारतीच्या स्वयंपाकघरात भीषण आग लागली ज्यामुळे नंतर ही आग संपुर्ण इमारतीत पसरली. या इमारतीत जवळपास १६० लोक राहत होते. यातील बरेच कामगार भारतीय होते.

- Advertisement -

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिलीय. आगीत ४१ जणांच्या मृत्यूवर जयशंकर यांनी दु: ख व्यक्त केलेय. ४० हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ५० हून अधिक जण जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान आगीत मृत पावलेल्या लोकांमध्ये बहुतांश भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही आग स्थानिक वेळेनुसार ४ वाजण्याच्या सुमारास लागली. यावेळी बहुतांश लोक झोपलेले होते. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला. औद्योगिक प्लांटमध्ये काम करणाऱ्या लोकांना राहण्यासाठी या इमारतीचा वापर केला जातो.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत मोठ्या संख्येने दक्षिण भारतीय भाषिक लोक राहतात. या आगीची भिषणता इतकी होती की काही जणांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारल्या. या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते. आतापर्यंत मिळालेल्या माहतीनुसार या घटनेत ४३ लोक जखमी झाले आहेत.

कुवेतमध्ये भारतीय राजदुतांनी एक्सवर आपातकालीन हेल्पलाइन नंबर दिलाय +९६५-६५५०-५२४६ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करुन या घटनेप्रकरणी माहिती मिळवता येईल. दूतावासानेही शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या