Monday, June 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराजकोट मध्ये अग्नीतांडव

राजकोट मध्ये अग्नीतांडव

गेम झोनमध्ये आग लागून मोठी दुर्घटना

राजकोट
गुजरात राज्यामधील राजकोट येथील एका गेम झोनमध्ये मोठी आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

या आगीमध्ये १५ ते २० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते . या गेम झोनपासून एक किलोमीटर परिसरामध्ये धुर पसरला आहे. शाळकरी लहान मुलांना सुट्टी असल्याने त्यांची या ठिकाणी गर्दी होती, ही घटना घडली त्यावेळी लहान मुलेही उपस्थित होती.

राजकोटच्या गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिल्या आहेत . नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या