Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्या५६ सोनसाखळी गुन्ह्यांचा म्होरक्या गजाआड

५६ सोनसाखळी गुन्ह्यांचा म्होरक्या गजाआड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

गेल्या ३ वर्षात शहरात विविध १० पोलीस (Police) स्थानकात सोनसाखळीच्या (Gold chain) घडलेल्या गुन्ह्यांची (Crime) उकल करण्यात पोलीस विभागाला यश मिळाले आहे…

यामध्ये ५६ सोनसाखळी गुन्ह्यांचा म्होरक्या गजाआड झाला असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७१ तोळे सोने, रोख अडीच लाख असे एकूण २९ लाख ३२ हजार १७६ रुपयांचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) विशेष पथकाने ही कामगिरी केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी या पथकातील अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पथकाला १० हजार रुपयांचे बक्षीसदेखील दिले.

दरम्यान, पकडण्यात आलेल्या संशयितांमध्ये मुख्य संशयित दंगल उर्फ उमेश अशोक पाटील (२७, रा. जय भवानी रोड, नाशिकरोड), तुषार बाळासाहेब ढिकले (३०, रा.आडगाव शिवार, नाशिक) विरेंद्र उर्फ सॅम शशिकांत निकम (३४, रा.सिन्नर फाटा, नाशिक), गोपाळ विष्णू गुंजाळ (३४, रा.पौर्णिमा बस स्टॉप, नाशिक), अशोक पंढरीनाथ वाघ, मुकुंद गोविंद बागुल आणि मुकुंद केदार दयानकर यांचा समावेश आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या ५६ सोनसाखळी गुन्ह्यांपैकी २०१९ मध्ये १०, २०२० मध्ये २० आणि २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत २६ गुन्हे संशयिताने विविध पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात केले होते.

यात आडगाव येथे २, म्हसरूळ येथे ३, पंचवटी येथे ४, भद्रकाली येथे ४, सरकारवाडा येथे ४, मुंबई नाका येथे ९, गंगापूर येथे ६, अंबड येथे ७, इंदिरानगर येथे १० आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ गुन्हे केले होते.

आमच्या दोन कॉन्स्टेबलने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस खात्याला अभिमान आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख यांनी सोनसाखळी चोरांचा बिमोड करायचा असे ठरवले होते. ही संपूर्ण टीमची सो सोनार की एक लोहार की अशी कामगिरी आहे कामगिरी आहे. पोलीस खात्याच्या एकेका कॉन्टेबल मध्ये एवढी ताकद आहे तो काय करू शकतो हे यांनी दाखवून दिले आहे.

– दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक शहर

- Advertisment -

ताज्या बातम्या