Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रमाथेरानची राणी पुन्हा धावणार! चाचण्या सुरु

माथेरानची राणी पुन्हा धावणार! चाचण्या सुरु

माथेरान | वृत्तसंस्था

नेहमीच थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरानमध्ये फेरफटका मारताना पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची राणी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. गेल्या काही दिवसांपासून ही ट्रेन बंद स्वरुपात असल्याने पर्यटकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, अमन लॉज ते माथेरान स्टेशन अशा चाचण्या असल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisement -

माथेरानच्या डोंगरावरुन जाणाऱ्या या ट्रेनला गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.

गेल्या वर्षी रेल्वेरुळांची दुरुस्ती आणि इंजिनाच्या दुरुस्तीनंतर माथेरानची गाडी रुळावर आली. पण पावसाळ्यात झालेल्य़ा अतिवृष्टीमुळे पुन्हा रेल्वे रुळाचे नुकसान झाल्याने ही ट्रेन थांबली. यामुळे ट्रेन दसऱ्याला सुरु होणार असली तरीही ती अद्याप सुरु झालेलीच नाहीये.

तिकडे नेरळ माथेरान रेल्वे मार्गाची दुरुस्ती वेगाने सुरु झाली असल्यामुळे ती आता अंतिम टप्प्यात आहे. यामुळे ट्रेनच्या चाचण्या सुरु झाल्या असून लवकरच ट्रेन पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बोगस शालार्थ आयडीतून वेतन; शिक्षण उपसंचालकांकडून लेखाधिकारी व...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) दहा शिक्षण संस्थांत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची (Employees) बोगस भरती करून या शिक्षकांना (Teachers) बनावट कागदपत्रांच्या...